भूम (प्रतिनिधी)- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी लागण्यात येणारी कागदपत्रे काढण्यासाठी भूम येथील आपले सरकार सेवा केंद्र, महा-ई सेवा केंद्र, तलाठी कार्यालमध्ये महिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी पहावयास मिळत आहे.

राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना राज्य सरकारकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली. महाराष्ट्रात या योजनेबाबत महिलांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे. माझी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरण्यासाठी महिलांची तोबा गर्दी झाली आहे. या योजनेअंतर्गत अर्ज दाखल करण्यासाठी तलाठी कार्यालये फुल्ल झाले आहे. भूम तालुक्यातील तलाठी कार्यालयात मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.

आपले सरकार केंद्रावर बसायला सुद्धा जागा नाही. योजनेचे फॉर्म भरण्यासाठी महिलांनी मोठी गर्दी केली आहे. नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजित पवार यांनी माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली. या योजनेअंतर्गत महिलांना 1500 रुपये प्रती महिना देण्याची घोषणा केल्यानंतर आता 1 जुलै पासून हे अर्ज भरण्यासाठी महिलांनी एकच गर्दी केली आहे. यासाठी महिलांनी तलाठी कार्यालये व आपले सरकार केंद्रात मोठी गर्दी केल्याचे पाहायला मिळत आहे. लाडकी बहीण योजनेच्या कागदपत्रांसाठी महिलांची भूम शहरामध्ये गर्दी झाल्याचं दिसत आहे. पहिल्याच दिवशी लाडकी बहीण योजनेसाठी महिलांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. अशातच भूम मध्ये महिलांनी उत्पन्नाचा दाखला, रहिवाशी दाखला, रेशनकार्ड मधून नाव कमी करणे अथवा वाढवणे यासाठी तहसील कार्यालयात मोठी गर्दी केलेली पाहायला मिळत आहे.


 
Top