ढोकी (प्रतिनिधी)- लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त पंधरवाडा उत्सव समिती ढोकी यांच्या वतीने त्यांच्या जीवनावर आधारित व्याख्यान ढोकी येथील तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना संचलीत तेरणा साखर प्रशालेत बुधवार दि.24 रोजी आयोजित करण्यात आले होते.

प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लहुजी साळवे, क्रातीज्योती सावित्रीबाई फूले यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. नंतर मकरंद पाटील यांनी आण्णा भाऊ साठे यांच्या जीवनावर आधारित व्याख्यान देण्यात आले. यावेळी माजी पंचायत समिती सदस्य संग्राम देशमुख यांनी वर्गणी ऐवजी दरवर्षी 50000 रुपयाचे शैक्षणिक साहित्य वाटप करण्याचे घोषित केले. तसेच समितीच्या विविध उपक्रमबद्दल कौतुक केले. आनंद कसबे यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा रेखाताई सुरेश कदम, प्रकाश भडंगे, राहुल पोरे,उपस्थित होते. सूत्रसंचालन जनार्धन सुरवसे यांनी केले. तर आभार मुख्याध्यापक संजय पाटील यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.

 
Top