धाराशिव (प्रतिनिधी)- सुरत चेन्नई ग्रीन कॉरिडोर महामार्ग धाराशिव जिल्ह्यातून जात आहे. हा सहा पदरी महामार्ग असून या महामार्गामुळे जिल्ह्यातील उद्योग व्यवसायांना चालना मिळणार आहे. तसेच जिल्ह्यातील शेतीमालाला चेन्नई व सुरत सारख्या दोन मोठ्या बाजारपेठांशी दळणवळण व संपर्क निर्माण होणार आहे. या महामार्गावरील वैराग तालुका बार्शी येथे स्पर रोड द्वारे कनेक्टिव्हिटी देण्याबाबत खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली.


सुरत चेन्नई महामार्ग हा जिल्ह्यातून जात असला तरी धाराशिव शहर हे महामार्गापासून दूर अंतरावर असल्यामुळे या महामार्गास पर कनेक्टिव्हिटी देणे अत्यंत गरजेचे होते. हे बाब खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी पत्र देऊन नितीन गडकरी यांच्या निदर्शनास आणून दिले. तद्नंतर प्रत्यक्ष भेट घेऊन या संदर्भात  दि. 25/07/2024 रोजी कार्यालयात भेट घेऊन चर्चा करण्यात आली. यावेळी सदर स्पर कनेक्टिव्हिटीचे मंजुरीचे काम अंतिम टप्प्यात असल्याचे  नितीन गडकरी यांनी प्रत्यक्ष भेटी दरम्यान सांगितले. या महामार्गास मौजे वैराग तालुका बार्शी व मौजे तामलवाडी तालुका तुळजापूर या दोन ठिकाणी स्पर्‌‍ कनेक्टिव्हिटी देण्यात येणार आहे. असे कळविले आहे.


 
Top