ढोकी (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील ढोकी येथील तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना संचलीत तेरणा साखर प्रशालेतील इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंतच्या सर्व मुला-मुलींची कृष्ठरोग तपासणी आरोग्य विभागाच्या वतीने बुधवार दि.24 रोजी करण्यात आली.

डॉ.एम.आर कोरे, सहाय्यक संचालक कृष्ठरोग धाराशिव यांच्या मार्गदर्शनाखाली कृष्ठरोग निर्मूलन जनजागृती मोहीम तपासणी राबवण्यात आली. या टिमने तेरणा साखर प्रशालेतील पाचवी ते बारावीपर्यंत 1178 विद्यार्थापैकी 1089 विद्यार्थ्यांची तपासणी सर्वेक्षण करण्यात आले. त्यामध्ये 5 संशयित निघाले त्यानंतर कृष्ठरोग निवारण अंधश्रध्दा समज, गैरसमज व औषधोपचार याविषयी सविस्तर मार्गदर्शन आरोग्य विभागाचे निमवैद्यकीय कर्मचारी एन.टी सुर्यवंशी यांनी केले. तर ढोकी प्राथामिक आरोग्य केंद्राच्या आशासुपरवायजर तथा तेरणा साखर प्रशालेच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या नूतन उपाध्यक्षा रेखाताई गुंजकर-कदम यांनी मुलींना कृष्ठरोग निर्मूलन या विषयी सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी मुख्याध्यापक संजय पाटील, अवैद्यकीय सहाय्यक पि.डि पाटील, एस.बी सांळुके, कृष्ठरोग तंञज्ञ बी.डी माने, एम.एस नागलबोने, निम्मवैदकीय कर्मचारी डि.एम नागलबोने, आशा स्वयंसेविका शिल्पा कसबे, सरिता खोत यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top