धाराशिव (प्रतिनिधी)- शेतकऱ्याचे संपूर्ण पीक कर्ज शासनाने माफ करावे. गाईच्या दुधाला 40 तर म्हशीच्या दुधाला 70 रुपये लिटरप्रमाणे भाव मिळावा व दुधासाठी उसाप्रमाणे एमएसपीचा कायदा करावा. विम्याचे पैसे ताबडतोब शेतकऱ्यांच्या खात्यावर वाटप करावे. कृषी खात्याची ठिबक स्प्रिंकलर व शेती औजारांचे 8 हजार 269 शेतकऱ्यांचे एक वर्षापासूनचे थकलेले अनुदान रुपये 19.50 कोटी रुपये त्वरीत द्यावेत.  जिल्ह्यातील अनेक साखर कारखान्यांनी उसाची बिले अद्याप दिलेली नाहीत. त्या साखर कारखान्याची साखर जप्त करुन शेतकऱ्याची बिले अदा करावीत. आदी मागण्यांसाठी सोमवारी दि.8 जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयसमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले. त्यानंतर जिल्हाधिकारी यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

राष्टवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी सन 2023 मधील शेतकऱ्यांचे नगदी पीक सोयाबीन कमी पावसामुळे हातचे गेले असून रब्बी हंगामातील हरभरा पिकाला एकरी अर्धा ते एक क्विंटल उतार मिळाला. शेतीला कमी पावसामुळे जिल्ह्यातील सामान्य माणुस, जनावरे यांची पाण्यामुळे दैनीय अवस्था झाली. जिल्ह्यातील शेतकरी व सामान्य माणसाच्या हजारो एकर जमीनी वर्ग 1 मधून वर्ग 2 मध्ये बदल केल्या. त्यापूर्वी प्रमाणे वर्ग 1 मध्ये कराव्यात. टेंभूर्णी लातूर चौपदरीकरणाचे काम त्वरीत चालु करुन जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील रस्त्याची कामे ताबडतोब चांगल्या पद्धतीने सुरु करावीत, आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.

यावेळी संजय निंबाळकर, भालचंद्र बिराजदार, नरदेव कदम, डॉ. सिध्दप्पा ताडेकर, बाळासाहेब कथले, बालाजी डोंगे, विठ्ठल माने, सुदन पाटील, ॲड प्रविण शिंदे, सागर चिंचकर, भारत शिंदे, इकबाल पटेल, अनिल जाधव, नामदेव चव्हाण, किशोर आवाड, नाना गरड, शामसुंदर पाटील, उत्रेश्वर धाबेकर, ओम धाबेकर, महादेव धाबेकर आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

 
Top