तुळजापुर (प्रतिनिधी)-   तुळजापूर तालुक्यात खरीप पिकांना पावसाची गरज असताना  रविवार दि. 7 जुलै रोजी शहरासह परिसरात  सततधार  स्वरुपाचा पाऊस झाला. सदरील पाऊस हा पुर्नवसु नक्षत्राचा पाऊस असुन तो एकदा चालु झाला कि लवकर थांबत नाही. या झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनामध्ये आनंदाचे वातावरण पसरले असले. तरी खरीप पिकांसाठी आणखी दमदार पाऊस गरजेचे असल्याचे बोलले जात आहे.

तुळजापूर तालुक्यात रविवारी सांयकाळी सात वाजता पावसाची संततधार सुरु झाली. ती साडेआठ वाजे पर्यंत ही सुरुच होती.सदरील पाऊस जमिनीत मुरणारा ठरणारा असल्याने आता बोअर, विहरी, ओढे, तलाव यांच्या पाणीसाठ्यात वाढ होणार आहे.

ह्यावर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीलाच पावसाने दमदार हजेरी लावली होती. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले होते. मृग नक्षत्रात जवळपास तालुक्यातील सर्व शेतकन्यांनी पेरणी उरकून घेतली. मात्र मागील गेल्या पंधरा दिवसापासून पावसाने काहीशी ओड दिल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले होते. गतवर्षी कमी पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला होता. माञ यंदा पिकांसाठी वेळेवर पाऊस पडत असल्याने ग्रामीण भागात आनंदाचे वातावरण पसरले आहे.


 
Top