धाराशिव (प्रतिनिधी)-   येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाला नॅक समिती कडून 'अ' दर्जा प्राप्त झाल्यामुळे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख, प्रभारी प्राचार्य प्रा .डॉ.सौ. विद्या देशमुख ,नॅक समन्वयक प्रा. डॉ.एस. एस. फुलसागर ,सह समन्वयक प्रा. डॉ.संदीप देशमुख यांचा सत्कार कु. सक्षणा सलगर यांच्याकडून करण्यात आला.

यावेळी सक्षणा सलगर म्हणाल्या की, रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाला नॅक समिती कडून 'अ' दर्जा प्राप्त झाला. ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. त्यापुढे म्हणाल्या की, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील डीबीटी स्टार दर्जा प्राप्त असणारे पहिले आणि एकमेव महाविद्यालय असल्याने महाविद्यालयाचा आणि येथील सर्व गुरुदेव कार्यकर्त्यांचा आम्हाला अभिमान वाटतो. महाविद्यालयाचा बदललेला चेहरा मोहरा पाहून मनाला समाधान वाटते असे त्या म्हणाल्या.   याप्रसंगी प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांनी सत्कारा बद्दल आभार मानले.   यावेळी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य प्रा.डॉ.सौ. विद्या देशमुख, नॅक समन्वयक प्रा.डॉ.एस.एस. फुलसागर, सह समन्वयक प्रा.डॉ. संदिप देशमुख, प्रसिध्दीप्रमुख प्रा.डॉ.मारुती लोंढे उपस्थित होते.

 
Top