कळंब (प्रतिनिधी)- राजर्षी शाहू सामाजिक संस्था खोंदला ता कळंब जि. धाराशिव या सामाजिक संस्थेमार्फत राबविल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय मी ज्ञानी होणार या सामान्य ज्ञानावर आधारित उपक्रमाची ब्रँड अँबेसिडर म्हणून उंदीरवाडी ता येवला जी नाशिक येथील कुमारी आदिती दत्तात्रय पवार हिची निवड करण्यात आली.आदिती पवार ही विद्यार्थीनी मागील तीन वर्षांपासून मी ज्ञानी होणार उपक्रमात सहभागी होत असून दररोजच्या मी ज्ञानी होणार प्रश्नावलीचे वैविध्यपूर्ण लेखनातील तिचे सातत्य कौतुकास्पद आहे.तिच्या या अप्रतिम लेखनामुळे मी ज्ञानी होणार उपक्रमातील अनेक विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळतआहे.
मी ज्ञानी होणार या उपक्रमांतर्गत सन 2024 25 25 या वर्षात महाराष्ट्र राज्यातील वेगवेगळ्या 20 जिल्ह्यांमधील सुमारे 300 शाळांमधील वीस हजार विद्यार्थी सहभागी आहेत.
राजर्षी शाहू महाराज सामाजिक संस्था खोंदला आयोजित मी ज्ञानी होणार उपक्रमाचे दिनांक 26 जून राजर्षी शाहू महाराज जयंती पासून सुरुवात होते.विद्यार्थ्यांमध्ये लहान वयातच स्पर्धा परीक्षेची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने राज्यभरातील 20 जिल्ह्यातील 300 शाळांमधून या उपक्रमाचे आयोजन करण्यात येते.यामध्ये नियमित समान्यज्ञानावर आधारित 5 प्रश्न सर्व शाळांना पुरविले जातात.प्रत्येक महिन्याला एक सराव चाचणीचे आयोजन केले जाते.12 जानेवारीला जिजाऊ जयंतीच्या वेळेस शाळा स्तरावर अंतिम परीक्षेचे आयोजन केले जाते यामध्ये प्रत्येक शाळेतून तीन क्रमांक काढले जातात. संस्थेमार्फत त्या तीन विद्यार्थ्यांना ट्रॉफी व प्रमाणपत्र दिले जाते.
12 जानेवारीच्या परीक्षेतून प्रत्येक शाळेतून तीन क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय परीक्षा घेण्यात येते. राज्यस्तरीय परिक्षेमधून मोठ्या गटातून 30 व लहान गटातून 10 विद्यार्थ्यांची निवड करण्यात येते. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना संस्थेमार्फत 501 शिष्यवृत्ती व प्रमाणपत्र देण्यात येते. आदितीच्या मी ज्ञानी होणार उपक्रमाच्या च्या ब्रँड अँबेसिडरपदी निवडीबद्दल संस्थेच्या वतीने तिचे अभिनंदन करण्यात आले.