कळंब (प्रतिनिधी)- कळंब तालुका विधिज्ञ मंडळ या अतितटीच्या निवडणूकीत अध्यक्षपदी अँड. बि. बी. साठे तर सचिव पदी अँड. दिनेश पौळ यांची निवड झाल्याने न्यायालय परिसरात जल्लोष साजरा केला. 

कंळब येथील न्यायाल्यातील विधीज्ञ मंडळाची सन 2024- 25 वार्षीक निवडणूक दि. 30 जुलै रोजी झाली. यात  अध्यक्ष पदासह  दोन उमेदवारात सरळ लढत झाली.  एकून मतदान 144 मतदारांपैकी 128 मतदारांनी आपला मतदानाचा हव्क बजावला होता.  यावेळी निवडणूक आधिकारी यांनी अध्यक्ष म्हणून अँड. बी. बी. साठे   यांना विजयी घोषीत केले. तर सचिवपदी अँड. दिनेश पौख, उपाध्यक्षपदी अँड. अजिंक्य शिंदे, महिला उपाध्यक्षपदी अँड. धनश्री कांबळे   व कोषाध्यक्षपदी अँड. दत्तात्रेय कवडे यांची निवड झाल्याचे घोषीत केले. या वेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अँड. अमरसिंह ढेपे, सहायक अधिकारी म्हणून अँड. एस. एम. जाधवरयांनी काम पाहिले. तर न्यायालयात विजीयी विधीज्ञ मंडळाचे सत्कार करून आनेकांनी त्यांचे कौतुक केले.

 
Top