ढोकी (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील ढोकी येथे आषाढ महिन्याच्या शेवटीच्या आठवड्यात मरी आई लक्ष्मीदेवी ची परंपरे नुसार दि 30 वार मंगळवार रोजी मोठया आनंदात आणि उत्साहात यात्रा संपन्न झाली.

आषाढ महिना सुरु होताच ढोकी येथील सोसायटी मैदानाजवळ असलेल्या मरीआई लक्ष्मीदेवी च्या मंदिरात मंगळवारी व शुक्रवारी तसेच आषाढ महिन्यात महिला मोठया संख्येने जमून देवीची मनोभावे पुजा -अर्चा करतात. या पूजेला ग्रामीण भागात विशेष महत्व दिले जात.  

या यात्रेच्या प्रारंभी एका सुप मध्ये दुरडी व त्यात देवता ठेऊन ही यात्रा भीमनगर मधील पारावर पुजा करून सुरु होते. धनगर गल्लीतुन सुतार गल्ली मधील सुतार बांधव अभिमन्यू सुतार, राजेंद्र सुतार व गुणवंत सुतार यांनी यांनी लाकडा पासून तयार केलेल्या गाड्यात या सुपातील देवता ठेऊन पुजा केली जाते. हा लाकडी गाडा सुतार गल्लीतुन सोनार गल्ली, देशमुख वाडा, हनुमान मंदिर चौक, व गावच्या मुख्य वेशी मधून झाँज, हलगी या पारंपरिक वाद्याच्या निनादात मंदिरात प्रवेश करते. या ठिकाणी मंदिराचे मुख्य पुजारी जग्गनाथ ढवारे, पोलीस पाटील राहुल वाकुरे, श्रीकांत ढवारे, पोतराज मामाजी लोखंडे दत्तात्रय तिवारी यांच्या हस्ते विधिवत आरती करण्यात आली. या वेळी मंदिराला आकर्षक रंग रंगोटी व विद्युत रोषणाई करण्यात आली होती. आरती नंतर भाविक महिला -पुरुष भक्तांनी मोठया प्रमाणात गर्दी केली होती यात्रा अत्यंत उत्सहात आणि शांततेत संपन्न झाली.



 
Top