ढोकी (प्रतिनिधी)- श्री क्षेत्र शेगाव जि. बुलढाणा येथून पंढरपूरकडे आषाढी वारीच्या सोहळ्यासाठी निघालेल्या श्री संत गजानन महाराज पालखी सोहळ्याचे दि. 5 जुलै रोजी ढोकी नगरीत मोठया उत्साहात व भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आले.

पंढरपूरला आषाढी सोहळ्यासाठी शेगावहुन 13 जून 2024 रोजी निघालेल्या या पालखी सोबत जवळपास पायी चालणारे 700 वारकरी, दोन अश्व, वारकऱ्यांच्या नियोजनासाठी 9 मोठी वाहने, ऍम्ब्युलन्स, डॉक्टर असा फौजफाटा आहे. या पालखीचे जिल्ह्यात आगमन होतच मोठया श्रद्धेने, भक्तीभावाने, आणि मोठया उत्साहात ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. ढोकी नागरीच्या सीमेवर आगमन होताच ढोकी ग्रामपंचायत व परिसरातील हजारो भाविक भक्तांनी मोठया उत्साहात फाटाक्यांची अतिशबाजी करीत भक्तीभावाने स्वागत केले. शेकडो वारकऱ्यांच्या लावाजाम्यासह टाळ मृदंगच्या निनादात हरीनामाचा जयघोष करत निघालेला हा सोहळा ढोकी मुक्कामी पोहोचला. कारखाना पालखी स्थळी पोहताच तेरणा कारखान्यांच्या वतीने कार्यकारी संचालक केशव सावंत यांनी स्वागत केले.

यावेळी पालखी तळावर ढोकी परिसरातून आलेल्या हजारो भाविक भक्तांनी मनोभावे दर्शन घेतले. या आलेल्या सर्व वारकरी तसेच परिसरातील भाविक भक्तांना भारत काका देशमुख व देशमुख कुटुंबियांच्या वतीने महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली. दि 6 जुलै रोजी पहाटे 5 वाजता हा पालखी सोहळा श्री संत गोरोबाकाका कुंभार यांच्या तेर नगरीकडे प्रस्थान केले. तर दुपारी किणी येथे जेवण व आराम करून उपळा (मा) या ठिकाणी मुक्कामी पोहचेल. त्यांनतर 7 जुलै रोजी गजानन महाराजांची पालखी धाराशिव येथे मुक्कामी येणार आहे.

 
Top