तुळजापूर (प्रतिनिधी)- मराठायोध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या मार्गदर्शन 10 जुलै 2024 रोजी मराठा आरक्षण जागृती शांतता रँली प्रचारार्थ ग्रामीण भागात घेतल्या जाणाऱ्या मराठा समाज बांधवांच्या गावभेट दौरा बैठकांना मराठा समाज बांधवांचा उस्फुर्त मोठा प्रतिसाद मिळत आहे. या रँलीत बार्शी तालुक्यातील समाज बांधव सहभागी होणार असल्याचे समजते.

सध्या मराठा समाजचे मंडळी गावोगाव जावुन मंदीर सभागृह, उघड्यावर बैठका घेवुन या रँलीत सहभागी होण्याचे आवाहन करीत आहेत. यात मुलगा, वडील, आजोबा अशा तिन पिढ्या उपस्थितीत राहत असल्याने मराठा आरक्षण प्रश्न गंभीर बनल्याचे दिसुन येत आहे. या बैठकांना तरुणाई मोठ्या संखेने हजेरी लावत आहे. तसेच शहरातील वकिल, डाँक्टर, व्यापारी बांधवांच्या ही बैठका घेण्यात आल्या आहेत. काही शैक्षणिक संस्थामध्ये जावुन तेथे कार्यरत असणाऱ्या मराठा समाज बांधवांना शांतता रँलीत सहभागी होण्याचे आवाहन करीत आहेत.


 
Top