धाराशिव (प्रतिनिधी)- आयुर्वेद आणि युनानी वैद्यकीय क्षेत्रात संशोधन करुन वेगवेगळ्या आजारांच्या रुग्णांना दिलासा देणारे हैद्राबाद येथील प्रसिद्ध डॉक्टर अताउल्लाह खान यांचा अंजुमन वेल्फेअर सोसायटीच्या वतीने सत्कार करण्यात आला.

डॉ.अताउल्लाह खान यांनी वैद्यकीय क्षेत्रात एमडी (इएच) ही पदवी संपादन केलेली असून आयुर्वेदिक उपचार करुन अनेक दुर्धर आजारावरील रुग्णांना मोठा दिलासा दिलेला आहे. सध्या हैद्राबाद, गुलबर्गा, बेंगलोर येथे ते रुग्णांना वैद्यकीय सेवा देत आहेत.  त्यांच्याकडे उपचार घेऊन बरे झालेले रुग्ण आज सर्वसामान्य आयुष्य जगत आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन अंजुमन वेल्फेअर सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष फेरोज पल्ला यांनी गुलबर्गा येथे जाऊन डॉ.खान यांचा सन्मानचिन्ह, टोपी व शाल देऊन  सत्कार केला. यावेळी अंजुमन वेल्फेअर सोसायटीच्या वतीने धाराशिव जिल्ह्यातील गरजू रुग्णांना वैद्यकीय उपचारासाठी देण्यात येणारी मदत तसेच सामाजिक क्षेत्रात करण्यात येणार्‍या विविध उपक्रमांची माहिती अध्यक्ष पल्ला यांनी दिली. यावेळी सोसायटीचे सदस्य वसीम शेख उबेद शेख, सरफराज पटेल, आसिफ शेख, वसीम तांबोळी उपस्थित होते.

 
Top