धाराशिव (प्रतिनिधी)-क्रीडा युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, मराठवाडा शिक्षक आमदार विक्रम काळे आणि युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांचा वाढदिवस विविध समाजोपयोगी कार्यक्रमाने साजरा करण्यात आला. 

क्रीडा व युवक कल्याण मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी धाराशिव जिल्ह्याचे संपर्कमंत्री संजय बनसोडे, मराठवाडा शिक्षक आमदार विक्रम काळे, आणि युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त शासकीय रुग्णालय येथे रुग्णांना फळे वाटप करण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले व जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या आवारात वृक्ष लागवड करून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या वतीने वाढदिवस साजरा करण्यात आला.

वाढदिवसानिमित्त जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये रुग्णांना फळे वाटप करत असताना जिल्हाध्यक्ष यांनी रुग्णांची आपुलकीने चौकशी केली व आपण लवकर बरे व्हावे अशी भावना व्यक्त केली. शासकीय रुग्णालय येथे रुग्णांना फळे वाटप केल्यानंतर येथील रुग्णांनी विक्रम काळे, क्रीडा व युवक कल्याण मंत्री मा.ना संजय बनसोडे व युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा व्यक्त केल्या. यावेळी जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे, जिल्हा कार्याध्यक्ष समयोद्दीन मशायक,प्रदेश संघटक सचिव खलील पठाण, धाराशिव तालुकाध्यक्ष प्रशांत फंड,धाराशिव शहर कार्याध्यक्ष मनोज मुदगल,सामाजिक न्याय मराठवाडा प्रदेश उपाध्यक्ष विवेकानंद साळवे,सामाजिक न्याय जिल्हाध्यक्ष अतुल जगताप, माजी सैनिक विभाग जिल्हाध्यक्ष मच्छिंद्र क्षीरसागर,अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष असद खान पठाण,सेवा दल सेल जिल्हाध्यक्ष सतीश घोडेराव, महिला जिल्हा कार्याध्यक्ष अप्सरा पठाण, विद्यार्थि जिल्हा कार्याध्यक्ष प्रतीक माने,धाराशिव युवक शहराध्यक्ष निहाल शेख, धाराशिव महिला शहराध्यक्षा सुलोचना जाधव, तुळजापुर विद्यार्थी तालुकाध्यक्ष सोहेल बागवान, धाराशिव महिला तालुका कार्याध्यक्ष रुक्मिणी कुंभार,धाराशिव युवक शहरकार्याध्यक्ष संदीप बनसोडे, धाराशिव महिला तालु

का उपाध्यक्ष उषा लगाडे,धाराशिव अल्पसंख्यांक शहर अध्यक्ष अरफात काझी,धाराशिव अल्पसंख्यांक महिला शहर कार्याध्यक्ष अमिना शेख,धाराशिव अल्पसंख्यांक महिला शहर उपाध्यक्ष सना शेख,अंबेजवळगा जि.प गटप्रमुख सुरेश राठोड, सोमनाथ माळी, बाळासाहेब बनसोडेआदि पदाधिकारी, कार्यकर्ते, सहकारी उपस्थित होते.

 
Top