तुळजापूर (प्रतिनिधी)- तिर्थक्षेञ तुळजापूरात डेंगु साथ रोखण्यासाठी नगर परिषद स्वछता व साथरोग पसरु नये म्हणून  औषध फवारणी करीत असताना, दुसरीकडे नव्या बसस्थानक प्रवेशध्दारावर घाणीचे साम्राज्य पसरल्याने आहे. गावात स्वछता तर बसस्थानक अस्वछतेचा विळख्यात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या  अस्वछतेमुळे पुनश्च साथरोग शहरात पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ही परिस्थिती म्हणजे पुढच पाठ मागचे सपाट अशी असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

तिर्थक्षेत्र तुळजापूरात मागील पंधरा दिवसापुर्वी डेंगुचे रुग्ण आढळताच नगरपरिषद प्रशासन अँक्शन मोडवर येवु न डास निर्मुर्लनसाठी प्रथमता औषध फवारणी केली. नंतर औषध पावडर टाकुन आता धुराडा फवारणी केली जात असतानाच लातूर रोडवर असणाऱ्या नवीन बसस्थानक समोरच काही महाभागांनी कचरा आणुन टाकला आहे. पाऊस पडल्याने हा कचरा कुजल्याने येथे घाणीचे साम्राज्य पसरले आहे. यातुन प्रवाशांना ये-जा करावी लागत आहे. बसेस ही याच घाणीतुन जात आहेत. तर काही माणसिक रोगी येथेच बसुन राहत असल्याने गावात स्वछता तर बसस्टँन्ड परिसरात अस्वछता अशी परिस्थिती निर्माण झाल्याने अशा पध्दतीने कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.


 
Top