तुळजापूर (प्रतिनिधी)-तालुक्यातील गोंधळवाडी जुन्या शाळा व्यवस्थापन समितीचा कार्यकाल संपल्यामुळे, जि. प. प्रा. शाळा गोंधळवाडी येथे शाळा व्यवस्थापन समिती पुनर्रचना पालक मेळावा घेण्यात आला. सदरील मेळाव्यामध्ये नवीन शाळा व्यवस्थापन समिती रचना करण्यात आली.
यामध्ये अध्यक्ष म्हणून गणेश सातपुते, उपाध्यक्ष म्हणून श्रीमती कांताबाई सातपुते, तसेच सदस्य म्हणून कुंडलिक मोटे, रूपाली मोटे, मनोरमा सातपुते, नामदेव मोटे किरण रुपनर, प्रमोद मोटे तथा अनुसूचित जाती सदस्य म्हणून रेश्मा आयवळे, शिक्षणप्रेमी म्हणून धनाजी रेड्डी, व ग्रामपंचायत सदस्य सविता मोटे यांची निवड करण्यात आली. सदरील निवडीनंतर नवीन शाळा व्यवस्थापन समिती सदस्य तथा पालक सदस्य यांच्यामार्फत शाळेमध्ये वृक्षारोपण करण्यात आले. सदरील ग्रामपंचायत सदस्य श्री.पोपटराव मोटे माजी उपाध्यक्ष संजय मोटे निवडीसाठी शाळेतील पिंपळे, लालासाहेब मगर, तोटावाड, राऊत समस्त शिक्षक वृंद,सर्व विद्यार्थ्यांचे पालक, पुरुष व महिला, तरुण वर्ग,शिक्षक प्रेमी उपस्थित होते.