धाराशिव (प्रतिनिधी)- शहरातील ऋषीकेष संभाजीराव मुंडे धाराशिव यांची मुंबई, ठाणे व रायगड जिल्ह्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती झाली आहे. जिल्ह्यासाठी ही गौरवाची बाब ठरली आहे. अनेक ठिकाणी त्यांचा सत्कार होत आहेत.
ऍड.ऋषीकेष मुंडे यांना आपल्या वडिलांकडून वकिली व्यवसायाचा वारसा मिळाला आहे. त्यांच्या वडिलांनी जिल्हा न्यायाधीश म्हणून काम पहिले. त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत हृषीकेश यांनीही वकिलीची पदवी घेतली. 2010 पासून त्यांनी मुंबई येथे प्रक्टिस सुरु केली. 14 वर्षाच्या कारकीर्दमध्ये त्यांनी वेगवेगळ्या खटल्यात आपली विद्वता दाखवून दिली आहे. या अगोदर सुद्धा त्यांना राज्य शासनाने झोपडपट्टी पुनर्रविकास समिती वर घेतले आहे. आता त्यांच्यावर केंद्र शासनाने विशेष सरकारी वकील म्हणून जबाबदारी दिली आहे. मुंबई उच्च न्यायालय तसेच ठाणे व रायगड जिल्हा न्यायालय हे त्याचं कार्यक्षेत्र असणार आहे. यानंतर शहरातील त्यांच्या नातेवाईक यांच्यासह मित्रमंडळी कडून त्यांचे सत्कार होत आहेत. यापैकीच प्रातिनिधिक सत्कार प्रसंगी उपस्थित फेटा त्यांचे मामा पी.एन.पाटील मुख्याध्यापक छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, काका.शहाजीराव भोसले, मावसभाऊ शाम व शिवाजी जहागिरदार,अद्वैत पाटील ,अभिजीत प्रल्हाद मुंडे यांच्यासह सर्व कुंटुबिय उपस्थित होते.