धाराशिव (प्रतिनिधी)- विशालगड (कोल्हापूर) च्या पायथ्याशी असणाऱ्या छोटया-छोट्या वस्ती व गजापूर गावात गरीब मुस्लीम कुटूंबावर व धार्मिक स्थळावर जातीयवादी संघटनाच्या कार्यकर्त्यांनी जो भ्याड हल्ला केला आहे त्याचा निषेध करत धाराशिव शहरातील मुस्लिम समाजाच्या वतीने दि 16 जुलै रोजी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले आहे.

निवेदनात असे म्हटले आहे की उस्मानाबाद शहरातील लोक प्रतिनिधीक स्वरुपात एकत्र येऊन निवेदन देत आहोत की, दि. 14/07/2024 रोजी विशालगड कोल्हापूर येथे गडावरील अतिक्रमण उठवण्याच्या कारणावरुन जे नियोजीत अंदोलन करण्यात आले होते त्या अंदोलनात गडाच्या पायथ्याशी ज्या छोटया-छोट्या गावे आहेत त्या गावात जातीयवादी संघटनेच्या दहशतवादी गटाच्या लोकांनी एकत्र येऊन तेथील गरीब कुटूंबातील मुस्लीम समाजाच्या लोकांवर भ्याड हल्ला करुन तेथील मुस्लीम महिला, लहान मुले, वृध्द लोकांना अमानुषपणे मारहाण करुन त्यांची दुकाने, घरे, चार चाकी व दुचाकी वाहने यांची जाळपोळ केली आहे. तसेच अत्यंत चिड आणणारी घटना म्हणजे तेथील मुस्लीम समाजाच्या धार्मिक स्थळावर या लोकांनी कट करुन विशेष लक्ष करुन धार्मिक स्थळाची मोठ्या प्रमाणावर नासधूस करुन धार्मिक स्थळाचे पावित्र नष्ट केले आहे. या घटनेचा आम्ही तिव्र निषेध करीत आहोत. वरील प्रकारच्या घटना या कोल्हापूर-सांगली या भागामध्ये नेहमी घडत असुन अल्पसंख्यांक मुस्लीम समाजाला टार्गेट करण्याचे काम नेहमी होत आहे.

त्यामध्ये समाजावर हल्ले करणे, धार्मिक स्थळावर हल्ले करणे असे प्रकार होत असुन यामध्ये जिवीत्त व वित्त हानी समाजाची होत आहे. ही बाब महाराष्ट्र सारख्या शाहु, फुले, आंबेडकर यांच्या कर्मभुमी असलेल्या राज्यामध्ये घडणे ही अत्यंत निंदनिय गोष्ट असुन महाराष्ट्र सारख्या पुरोगामी राज्याला लाजीरवाणी आहे. महाराष्ट्रामधील मुस्लीम समाज इतर समाजाबरोबर शांततेने राहत असुन वरील घटना या समाजाच्या सहनशिलतेच्या पुढचे असुन तरी समाज या गोष्टीचा लोकशाही मार्गानेच निषेध करीत आहे. या बाबीचा आपण गांभीर्याने दखल घ्यावी जेणेकरुन भविष्यात समाजामध्ये शांतता टिकुन राहील. वरील घटनेस समाजातील जे जातीयवादी संघटना व त्यांचे गुंड कार्यकर्ते जबाबदार आहेत त्यांच्यावर कठोरात कठोर कायदेशीर कार्यवाही व्हावी जेणेकरुन भविष्यात समाजामध्ये शांतता राहील व या घटनेमध्ये ज्या लोकांचे आर्थिक नुकसान झाले आहे त्यांना शासनाकडुन ताबडतोब नुकसान भरपाई व्हावी तसेच तेथील मुस्लीम समाज व त्यांचे धार्मिक स्थळे यांना पुर्ण संरक्षण देण्यात यावे आणि विशालगड कोल्हापूर अतिक्रमण हटाव मोहिम हातात घेवुन घटनेस जे-जे व्यक्ती जबाबदार आहेत त्यांच्यावर सुध्दा कठोर कायदेशीर कार्यवाही व्हावी ही विनंती. निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. 

या निवेदनावर शेख मसुद, कादर खान, आयाज शेख, बाबा मुजावर, खलील सय्यद, अफरोज पिरजादे, खलील पठाण, शाकेर पठाण , वाजित पठाण, काझी एजाज, शाहनवाज सय्यद, इम्रान खान, शेख रसुल, बिलाल आर. , मोमीन सरफराज, शेख इस्माईल, ईल्यास पीरजादे, कलीम कुरेशी, असद पठाण, सजियोद्दीन शेख, चांदपाशा नदाफ, जाकेरखॉ पठाण इ. दीच्या स्वाक्षऱ्या आहेत.

 
Top