कळंब (प्रतिनिधी)-कळंब तालुका शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या वतीने रविवार दि.7 रोजी सेवानिवृत्त झालेल्या शिक्षक सभासदांचा तसेच नवोदय प्रवेश पात्र, शिष्यवृती धारक  व 10 वी व 12 वीत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा  सन्मान चिन्ह, रोख बक्षिस व पुस्तक देऊन गौरव करण्यात आला.

राधेशाम मंगल कार्यालय कळंब येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डाँ.दयानंद जटनुरे ,आधार हाँस्पिटल कळंब चे संचालक डाँ.महादेव कोरसाळे, गटशिक्षणाधिकारी धर्मराज काळमाते, प्राथमिक शिक्षक महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा पतसंस्थेचे अध्यक्ष बाळकृष्ण तांबारे, राज्य शिक्षक संघाचे उपाध्यक्ष सोमनाथ टकले, जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष संतोष देशपांडे  शिक्षक संघाचे नेते विठ्ठल माने, जिल्हा शिक्षक पतसंस्थेचे उपाध्यक्ष कांतीनाथ ढोले होते.

या प्रसंगी श्री. डॉ. जटनुरे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना म्हणाले की विद्यार्थ्यांनी जागतिक स्पर्धेमध्ये उतरण्यासाठी मातृभाषेबरोबरच इतर भारतीय व   वेगवेगळ्या देशाच्या भाषा आत्मसात  करणे गरजेचे आहे. कळंब तालुका शिक्षक पतसंस्था सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा प्रत्येक वर्षी गौरव करुन प्रोत्साहन देते ही बाब कौतुकास्पद आहे.

डॉ. कोरसाळे यांनी विद्यार्थ्यांनी प्रतिकुल परिस्थिती आली तरी नाउमेद न होता सतत प्रयत्नशिल असले पाहीजे, शिक्षणाबरोबरच आपल्या आरोग्याची पण काळजी घेणे महत्त्वाचे आहे. तांबारे यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबर संस्कारक्षम होणे गरजेचे आहे .आपल्या आई - वडीलाच्या परिश्रमाची व कष्टाची जाणिव ठेवली पाहिजे असे सांगितले. तसेच संतोष देशपांडे ,विठ्ठल माने यांनी ही आपले विचार,व्यक्त केले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संचालक दत्तात्रय पवार, गणेश कोठावळे , दत्तात्रय सुरेवाड,भुषण नान्नजकर ,दिपक चाळक, सुनिल बोरकर,अशोक डीकले, श्रीमती कालिंदा मुंढे, भागवत जाधवर, रविंद्र शिनगारे, रामचंद्र पवार, वैशाली क्षिरसागर, संतोष ठोंबरे,प्रशांत घुटे,राहुल तामाने, शिवाजी शिंदे,कृष्णा जाधव यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्तविक संचालक भक्तराज दिवाने,सुत्रसंचलन श्रीमती ज्योती ढेपे तर आभार अशोक डीकले यांनी मानले.

या सेवानिवृत्त शिक्षक व विद्यार्थ्यांचा झाला गौरव

 सेवानिवृत्त शिक्षक

विलास कदम, नरहरी नानजकर,मारुती कांबळे,अशोक कांबळे,राजाभाऊ उकीरडे,महादेव सौदागर,शिवहर धोंगडे,धर्मराज मंडके,गोकुळदास गोरे,दत्तात्रय चौधरी,तानाजी कदम, विठ्ठल माने,धनाजी पाटील,भास्कर घावटे,लक्ष्मण पडवळ,राम सिरसट,सतिश गिरी,रऊफ खान,श्रीमती मैनाबाई सुरवसे,


नवोदय प्रवेश पात्र विद्यार्थी

अमेय गावखरे,ओम डांगरे,अनुराग रणदिवे ,गार्गी आरडले,तेजस कसपटे,अथर्व तांबारे,


शिष्यवृती धारक विद्यार्थी 5 वी

रिया चौधरी,वेदांत नलवडे,अमेय गावखरे,स्वरा मडके,अभिनव मते,हर्ष पांगळ,कार्तिक माने,मानसी तोडकर,तेजस कसपटे,जय मडके,ओम डांगरे,राजवर्धन बारकुल,गार्गी आरगडे,वेदांत अवधूत.


8वी शिष्यवृती धारक विद्यार्थी

प्रथमेश शिंदे,प्रज्ञा डोरले,साईली निरफळ,सिद्धार्थ चौधरी,स्वरुप हवलदार,प्रविण गवळी


10वी विद्यार्थी

प्रथमेश शिंदे,आदिती कुलकर्णी ,समर्थ पांडे,विश्वजित बांगर,तन्मय वाघमारे,अनुष्का गरुडे,विनायक सलगरे,सोहम पुरी,संजना गिरे,वैष्णवी नलावडे,मानस वाघमारे,आदर्श बाभळे,मधूरा बारटक्के,सावित्री पाळवदे,आदित्य वाघमारे,अमिन शेख फकीर मृणाल बांगर,यफाई अदमान चाऊस,अक्षता साळुंके ,गायीत्री दहिवले,वेदांत जाधवर,मंथन निरफळ,कृष्णा गायकवाड ,सिद्धि चोंदे,योगेश ढाले,कनक डांगरे,गितांजली बोधले,शिवम चोंदे,प्रणव रोटे,रुद्रप्रसाद गिराम.


12 वी विद्यार्थी

श्रावणी शेळके,मानसी खडके,प्रज्वल मुळे,श्रेयस पाडे,अथर्व पवार,आकांशा आंधळे,शंतनु ढोले,अमरजा ढेपे,संस्कार लोमटे,सोहन तापडीया,सौरभ गंभिरे, आकांशा पवार,प्रितम साबळे,आदिती शेळके,राजनंदीनी शेळके अमित घोंगडे,अथर्व पांचाळ,वेदांती घोरपडे,गुरुगणेश पांचाळ,चैतन्य भराटे,सुयश पसारे,सोनल सानप.

 
Top