तुळजापूर (प्रतिनिधी)- मराठा संघर्ष योध्दा मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात धाराशिव येथे 10 जुलै रोजी सकल मराठा समाजाच्यावतीने महाएल्गार शांतता रॅली काढण्यात येणार आहे. या रॅलीसाठी तुळजापूर  तालुक्यातून लाखोच्या  संख्येने मराठा समाज बांधव, सहभागी होणाचे नियोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला. येथील तुळजाभवानी पुजारी मंडळ मंगल कार्यालयात सोमवार (दि.1) रोजी सकल मराठा समाजाची बैठक घेण्यात आली. यात धाराशिव येथे 10 जुलैला काढण्यात

येणाऱ्या शांतता रॅलीच्या संदर्भात यावेळी चर्चा करण्यात आली. आपल्या ओबीसीतुन आरक्षण हवे आहे हे लक्षात ठेवुन ही लढाई अंतिम आहे हे आता नाहीतर कधीच नाही हे समजुन मराठा संघर्ष योध्दा मनोज जरांगे यांना साथ व पाठबळ देण्यासाठी तालुक्यातील गावागावातुन, घराघरातुन लेकराबाळासह या रँलीत लाखोच्या संखेने स्वयंस्फुर्तीने सहभाग होण्याचा निर्णय घेण्यात आला.

यावेळी तालुक्यातील सर्व तालुका, ग्रामीण भागातून आलेल्या प्रतिनिधी यांनी आपआपली मते मांडली. नियोजनात सक्रीय सहभागी होण्याचा निश्चय केला. जिल्हापरिषद  पंचायत समिती विभाग निहाय नियोजन करण्याचे ठरले. प्रत्येक गावात बैठका घेवून समाजाला प्रोत्साहित करण्याचा निर्णय झाला. यासाठी एक समिती गठीत करण्यात आली असुन त्यांच्या दोन टीम तयार करण्यात आल्या आहेत. रोज पाच गावे अशा पध्दतीने गावोगाव, घरोघर प्रचार करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. तालुक्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती, गावनिहाय कार्यकर्त्यांवर जबाबदारी देण्याचे ठरले.

मराठा संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी दिलेल्या सुचनांचे पालन करीत आपल्या रँलीचा ञास कुठल्याही समाज बांधवांना न होता ही रँली शांततेत पार पाडण्याचे आवाहन सकल मराठा समाजाने यावेळी केले. गावस्तरीय बैठका व अडचणी तालुका स्तरीय समन्वय समितीकडे मांडण्याचे नियोजन ठरले. यावेळी शहरातील मराठा समाजातील सर्वच पक्षांच्या युवा नेत्यांनी जबाबदारी वाटून घेवुन पाहिजे ती मदत देण्यास आम्ही तयार असल्याचे जाहीर केले. यावेळी शहर विशेषता  ग्रामीण भागातील  शेकडो युवा मराठा बांधव मोठ्या संखेने उपस्थितीत होते.

 
Top