कळंब (प्रतिनिधी)-   विद्यार्थ्यांनी आपले करिअर घडविण्यासाठी शाळेच्या सुरुवातीपासून अभ्यास  केला पाहिजे कष्ट, इमानदारी, प्रामाणिकपणा यामुळे जीवनात अपेक्षित ध्येय साध्य करता येते यासाठी हा विचार मेंदूतून हृदयात ठेवला पाहिजे असे विचार जगप्रसिद्ध प्लास्टिक सर्जन डॉ. विठ्ठलराव लहाने यांनी शि. म.ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयाच्या सांस्कृतिक सभागृहांमध्ये  किसनलाल जाजू व गोविंद जाजू स्मृति समारोह आयोजित इयत्ता दहावी गुणवंत विद्यार्थी सत्कार व मंत्र यशाचा या विषयावर करिअर गायडन्स कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत असताना व्यक्त केले. 

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डॉ.अशोकराव मोहेकर ,सचिव ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळा, दत्तात्रय लांडगे प्रभारी उप शिक्षणाधिकारी जि. प. धाराशिव, सुरेश टेकाळे जिल्हाध्यक्ष मुख्याध्यापक संघ धाराशिव ,प्रा. किशोर पानसे दयानंद महाविद्यालय लातूर, श्रीनिवास जाजू (प्रवर्तक) उदय देशपांडे लातूर, वरिष्ठ पत्रकार रणजीत खंदारे, बाळासाहेब कदम ,मुख्याध्यापक जि. प .कन्या प्रशाला, जाफर पठाण मुख्याध्यापक सावित्रीबाई फुले विद्यालय ,यांची प्रमुख उपस्थिती होती डॉ. विठ्ठल लहाने यांनी मंत्र यशाचा या विषयावर पुढे बोलत असताना यशाचा पासवर्ड सांगितला. या यामध्ये कमेंटमेंट कन्सल्टन्सी ,कनेक्टिव्हिटी, कॉन्फिडन्स याचे महत्त्व विशद करून  कष्टकरा ,पुस्तक पाठ करा गरिबी शिक्षणाची अडचण आहे. हा विचार डोक्यातून काढून टाका तुम्ही ठरवलेली प्रत्येक गोष्ट मेंदूतच नव्हे तर हृदयात ठेवली पाहिजे नापास ही शक्ती आहे ती आपणास पुढे घेऊन जाते मायबाप घरात असणे असेट आहे. विद्यार्थ्यापुढे एक तास बोललो तर विद्यार्थ्याचे जीवन बदलतय हा अनुभव घेऊन रुग्णसेवेतून वेळ काढून करिअर मार्गदर्शन करीत आहे. विद्यार्थ्यांना आनंदी व खुश बघायचंय असे विचार व्यक्त केले. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन, किसनलालजी जाजू व गोविंद जाजू ,शि.म. ज्ञानदेव मोहेकर गुरुजी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली यानंतर गोविंद जाजू यांना दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. समारोह समितीच्या वतीने उपस्थित प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते इयत्ता दहावी गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र ,ट्रॉफी व गुलाब पुष्प, साने गुरुजी यांचे श्यामची आई हे पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जगदीश जाजू यांनी सूत्रसंचालन काकासाहेब मुंडे यांनी तर आभार माधवसिंग राजपूत यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी,प्रवर्तक श्रीनिवास जाजू ,जगदीश जाजू ,महेश जाजू, प्रकल्प संचालक यशवंत दशरथ, डि.के. कुलकर्णी, उन्मेश पाटील, विक्रम गायकवाड, माधवसिंग राजपूत, पत्रकार बालाजी अडसूळ ,संभाजी गिड्डे सहयोगी शिक्षकवृंद काकासाहेब मुंडे, पवार, बाळासाहेब कदम, अशोक शिंपले, यांनी परिश्रम घेतले.    


पुढील शिक्षणासाठी अनुष्का लोंढे, प्रेरणा झोंबाडे, रोहित पवार, खुळे पायल, लाड मोहिनी या गुणवंत विद्यार्थ्यांना आर्थिक मदत देण्यात आली.                              


या गुणवंत विद्यार्थ्यांचा झाला सत्कार                          

अल्सबा रामपुरे 100 % विद्या भवन हायस्कूल, प्रसाद धोंगडे 99.60 % सावित्रीबाई फुले विद्यालय, प्राजक्तता काळे 99.20, सार्थक तांबारे 98.80% ( विद्याभवन हायस्कूल कळंब),  श्रेया गोरे 98.60% (सावित्रीबाई फुले विद्यालय कळंब), सुफिया उर्दू प्रशाला कळंब मोमीन सना, सय्यद अमानी,  जिल्हा परिषद कन्या प्रशाला कळंब -गंधुरे स्मृती, कदम प्राप्ती,  संत ज्ञानेश्वर महाराज निवासी मूकबधिर विद्यालय -चेतन आवटी, आदित्य  कोठावळे, जिल्हा परिषद प्रशाला( मुलांची)- कळंब (उर्दू माध्यम ) -पठाण इरम, शिफा मनियार, जिल्हा परिषद प्रशाला मुलांची कळंब (मराठी माध्यम) -पांचाळ पवन, शेख साहिल,  मॉडेल  इंग्लिश स्कूल - तन्मय  वाघमारे, मानक  वाघमारे, जनजागृती माध्यमिक विद्यालय -पठाण तहुरा ,धीरे आदित्य.  

 
Top