भूम (प्रतिनिधी)-आष्टा केंद्राचे केंद्रप्रमुख अंकुश उगलमोगले यांचा सेवापुर्तीनिमित्त आष्टा केंद्राच्या वतीने सन्मान करण्यात आला. अंकुश उगलमोगले हे रामेश्वरचे रहिवासी असुन प्राथमिक शिक्षक, पदवीधर शिक्षक ते केंद्रप्रमुख असा त्यांचा प्रवास झाला आहे. आपल्या कारकिर्दीत तालुका, जिल्हा तसेच अनेक संस्थेच्या वतीने त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. आष्टा केंद्राच्या वतीने गटशिक्षणाधिकारी राहुल भट्टी,विस्तार अधिकारी सोमनाथ टकले, मुख्याध्यापक जवाहर भोसले,विषय तज्ञ चव्हाण,विषयतज्ञ कुलकर्णी यांच्या हस्ते त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.यावेळी बालाजी गिलबिले,संजिवन तांबे, वैजिनाथ नरके, राजेंद्र गाढे तसेच केंद्रातील सर्व शिक्षक,शिक्षिका उपस्थित होते.

 
Top