कळंब (प्रतिनिधी)-कळंब नगर परिषद यांच्या वतीने प्रथमच आषाढी वारीसाठी पायी जाणाऱ्यासर्व दिंड्यांच्या स्वागतासाठी कळंब नगर परिषद सर्व सुख सुविधा यावर्षीपासून सलग पंधरा दिवस पुढे पुरवण्यात येणार आहे.  यामध्ये स्वच्छ पाणी त्याचप्रमाणे मोबाईल टॉयलेट, अंघोळी व सांडपाण्यासाठी टँकर उपलब्ध करून देणार आहेत.  मुक्कामाच्या ठिकाणी योग्य त्या सर्व सोयी या वर्षीपासून नगरपरिषदेचे मुख्य अधिकारी तथा प्रशासक गोपाळ तापडिया यांच्या मार्गदर्शनाखाली या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यासाठी त्यांनी एक समितीची नेमणूक करून या समितीमार्फत सर्व सोयी प्रत्येक पायी जाणाऱ्या दिंडीला, शहरात राहणाऱ्या मुक्कामी दिंडीला या सुविधा पुरविण्यात येणार आहे.  या सर्व सुविधेवर स्वतः प्रशासक म्हणून गोपाळ तापडिया हे बारीक लक्ष ठेवणार आहेत. जर कुठल्याही कर्मचाऱ्यांनी कामात कुचराई केल्यास त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाणार आहे. अशी माहितीही यावेळी त्यांनी दिली आहे. 

कळंब शहरातील सर्व रस्ते नाल्या चकाचक करण्यात आले आहेत. दिंडी मार्गावरील मुख्य रस्त्यावरची माती हे ट्रॅक्टर द्वारे काढण्यात आली आहे. त्याचप्रमाणे शहरात सर्वत्र दिवाबत्ती व नाल्या स्वच्छतेवर त्यांनी भर दिला आहे. या सर्व नियोजनाबद्दल कळंबकरांच्या वतीने के. डी. गव्हाणे, अनिल यादव, दत्तात्रेय लांडगे, गणेश सदाफुले यांनी त्यांचा दि. 2 जुलै रोजी नगरपरिषद कार्यालयात जाऊन  विठ्ठल रुक्मणी मूर्ती भेट देऊन त्यांचे कौतुक करण्यात आले आहे. शहरात मोकाट जनावराचा बंदोबस्त, त्याचप्रमाणे फिरस्ते कुत्रे व डुकराचाही बंदोबस्त त्यांनी केला आहे. त्याचप्रमाणे शहरात रस्त्यावर कचरा टाकण्यावरही निर्बंध घातले आहेत. यापुढे जर रस्त्यावर कचरा टाकल्यास दंडात्मक कारवाई करण्याचा इशाराही सर्व आस्थापनाधारक यांना देण्यात आला आहे. या सर्व सुख सुविधेबद्दल शहरवासीयांनी तापडिया यांच्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले आहे. शासनाच्या अनेक योजना या पारदर्शक राबवणार आहोत त्यासाठी कळंबकरानी सहकार्य करावे अशी अपेक्षाही प्रशासक गोपाळ तापडिया यांनी व्यक्त केली आहे. शहरात कुठेही कचरा अथवा नाली तुंबलेले असेल तर माझ्या वैयक्तिक व्हाट्सअप मेसेज करावा. एक तासात त्या ठिकाणी स्वच्छता करण्याच्या आश्वासनही त्यांनी दिले. याच प्रमाणे त्यांनी कामाचा चांगलाच धडाका लावला असून त्यांच्या कामाबद्दल कळंब शहरात सध्या सर्वत्र चर्चा होत आहे.

 
Top