धाराशिव (प्रतिनिधी)-महायुती सरकारने राज्यातील महिलांना आर्थिक स्वातंत्र्यासह स्वावलंबी, आत्मनिर्भर करण्यासाठी व  त्यांच्यावर विसंबून असलेल्यांचे पोषन व आरोग्य  सुधारण्यासाठी ‌‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजने अंतर्गत प्रतीमाह 1500 रु. देण्याची  योजना घोषित केली आहे.या योजनेचा धाराशिव जिल्ह्यासह धाराशिव-कळंब व  तुळजापूर मतदारसंघातील वयोवर्ष 21 ते 65 पर्यंतच्या पात्र महिलांनी लाभ घेण्याचे आवाहन रुपामाता उद्योग समुहाचे संस्थापक तथा प्रदेश कार्यकारिणी सदस्य अँड.व्यंकटराव गुंड केले आहे.

या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असलेल्या, कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असणाऱ्या 21ते  ते 65 या वयोगटांतील महिलांना लाभ होणार आहे. आधी अधिवास प्रमाणपत्र अनिवार्य होते. आता लाभार्थी महिलेकडे हे प्रमाणपत्र नसल्यास त्या ऐवजी 15 वर्षापूर्वीचे रेशनकार्ड, मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, जन्म दाखला या पैकी कोणतेही एक ओळखपत्र/प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल. अडीच लाख रूपयांचा उत्पन्नाचा दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशनकार्ड उपलब्ध असेल तर त्यांना उत्पन्नाचा दाखला प्रमाणपत्रातुन सुट देण्यात येणार असल्याचे संगितले.


 
Top