ताज्या घडामोडी



परंडा (प्रतिनिधी) - येथील शासकीय विश्राम गृह येथे डी. बी. ए. समूहाच्या वतीने गुरुवार दि.18 रोजी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची 55 वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली.

यावेळी डी.बी.ए. समूह संस्थापक अध्यक्ष दयानंद बनसोडे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा अध्यक्ष राहुल बनसोडे, महात्मा फुले समता परिषद जिल्हाध्यक्ष बिभीषण खुणे, परंडा पोलीस पाटील संजय कदम, खानापूर पोलीस पाटील दिलीप परिहार, ॲड. दयानंद धेंडे  यांनी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे दीप धूप प्रज्वलन करून पूजा केली. नंतर लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर दयानंद बनसोडे, दत्तात्रय पाटील (लोहारा) यांनी विचार मांडले. यावेळी सामाजिक नेते सलीम भाई शेख (वडनेर), दिव्यांग संघटना जिल्हाध्यक्ष धाराशिव पांडुरंग मिसाळ, राष्ट्रवादी शरद पवार गट जिल्हा कार्याध्यक्ष ओबीसी डॉ. नवनाथ वाघमोडे, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा सरचिटणीस घनश्याम शिंदे, मनसे नेते कमलाकर खैरे, मनसे तालुका सचिव बाळासाहेब कांबळे, संदिपान कांबळे, धर्मराज नरोटे, छगन चौधरी, नागेश थोरात, बाळासाहेब चतुर, विनोद जाधव, हैवत गायकवाड, महिला लक्ष्मीबाई जाधव, अयोध्या काकडे, आरती बनसोडे, सुषमा बनसोडे, संगीता बनसोडे, संगीत थोरात, सुजाता साळवे, आदींसह महिला व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते. शेवटी उपस्थितांचे आभार दयानंद बनसोडे यांनी मांडले.

 
Top