धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्ह्यातील गडदेवदरी निसर्ग रम्य परिसरातील तगर भुमी जेतवन बुध्द विहारात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी एक दिवसीय दि.4 ऑगष्ट रोजी वर्षावास महोत्सव साजरा करण्यात येणार आहे.

 दि.21 जुलै पासुन वर्षावासास सुरुवात होत आहे. या एक दिवसीय महोत्सवात पुजनिय भिक्खु डॉ. उपगुप्त महाथेरो पुर्णा यांची प्रमुख धम्मदेसना राहणार असुन यासोबत पुजनिय भिक्खु महाविरो थेरो, पु.भिक्खु पय्यानंद थेरो, पु.भिक्खु पय्यावंश, पु.भिक्खु बुध्दशिल, श्रामनेर राहुल, श्रामनेर सोनुत्तर यांची तर धाराशिव जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील सह इतर मान्यवर उपस्थिती राहणार आहेत. 

मौजे गडदेवदरी परिसरातील तीन एकर जागेत नव्याने तगर भुमी बुध्द विहाराची निर्मिती करण्यात येत आहे. धाराशिव जिल्ह्यातील उपासकांना वर्षावास काळातील धम्म देसणाचे आयोजन केले आहे. या महोत्सवात सर्वानी उपस्थित राहुन धम्म देसनाचा लाभ घ्यावा असे आवाहन भंते सुमेधजी नागसेन यांनी राजगीर बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या कार्यालयात प्रसिद्धी पत्रक प्रकाशित करतांना केले. यावेळी पु.भंते सुमेधजी नागसेन, अंकुश उबाळे, बंन्शी कुचेकर, संपतराव शिंदे, गणेश वाघमारे, बाबासाहेब बनसोडे, प्रकाश सिरसाठ तर कार्यक्रमाचे निमंत्रक बापु सोनटक्के सह इतर उपस्थित होते.

 
Top