तुळजापूर (प्रतिनिधी)- एसईबीसी  प्रमाणपत्र वाटपातील त्रुटी दूर करणे बाबत मुख्यमंत्री महोदयांना निवेदन दिले. त्यावर तत्काळ सचिवांना आदेश दिले अशी माहीती निवेदन कर्ते योगेश केदार यांनी दिली.

तुळजापूर  महाराष्ट्र शासनाच्या वतीने एसईबीसी  प्रमाणपत्र करिता सुधारित शासन निर्णय लागू केला असून त्यात दि.12 मार्च रोजीचा महाराष्ट्र शासनाचा शासन निर्णय रद्द केला आहे. सदर निर्णय रद्द केल्यामुळे महाराष्ट्रातील बहुतांश मराठा विध्यार्थ्यांचे म्हणजे एसईबीसी  प्रवर्गाचे शालेय तसेच आर्थिक नुकसान होणार आहे. आणि मराठा समाज अजून मोठ्या प्रमाणात नुकसानीस तोंड देऊ शकतो. तरी ते होणारे आर्थिक आणि शालेय नुकसानीचे संकट टाळण्याकरिता आपल्याला सांगू इच्छितो कि महाराष्ट्र शासनाच्या वतीने एसईबीसी  प्रमाणपत्र करिता सुधारित शासन निर्णय लागू केला आहे. त्यात असे नमूद करण्यात आले कि नवीन एसईबीसी प्रमाणपत्र काढण्यात यावे, परंतु शासनाची सेतू केंद्र, महा ई सेवा केंद्र इ. केंद्र मध्ये एसईबीसी  प्रमाणपत्र काढण्यासाठी मराठा समाजाचे विद्यार्थी गेले असता त्यांना निराश होऊन परत पाठवले जात आहे. आणि सांगितले जाते कि एसईबीसी प्रमाणपत्र काढण्याची सुविधा शासनाने आम्हाला अजून सेतू केंद्र, महा ई सेवा केंद्रच्या पोर्टल वरती सुरु केलेली नाही. त्यावर एसईबीसी  प्रमाणपत्र पर्याय निवडला असता जातीचा पर्याय दिसून येत नाही. त्यामुळे पुढे काहीही करता येत नाही असे सांगण्यात येते. मराठा समाजातील विद्यार्थ्यांचे शालेय, महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रिया सुरु असून सध्या नवीन शैक्षणिक वर्ष सुरु झालेले आहे. 

तरी बहुतांश मराठा समाजातील विद्यार्थ्यांचे नुकसान होताना दिसून येत आहे. तरी आपल्या माध्यमातून आमचे शासनाला विनंती आहे कि एसईबीसी   प्रमाणपत्र तत्काळ मिळण्याकरिता योग्य त्या मार्गदर्शक सूचना सर्व सेतू केंद्र, महा-ई सेवा केंद्र यांना देऊन विषय मार्गी लावावा आणि मराठा समाजातील विद्यार्थ्यांचे नुकसान टाळावे.

तसेच मराठा समाजाचे विवीध प्रश्न सोडवण्यात यावे यासाठी मंत्रालय मुंबई येथे स्वतंत्र तसेच महाराष्ट्र मधील प्रत्येक तालुक्यात मराठा कक्ष उभारण्यात यावा व त्या माध्यमातुन मराठा समाजाचे सर्व प्रश्न सोडवण्यात यावे. तशी शासकीय यंत्रणा यात उपलब्ध करावी अशी विनंती केली होती.

 
Top