कळंब (प्रतिनिधी)- तालुक्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यामंदिर डिकसळचा विद्यार्थी सिध्दार्थ तानाजी चौधरी याने इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत धाराशिव जिल्हा ग्रामिण विभागात सर्वसाधारण प्रवर्गातून द्वितीय क्रमांकाचे यश संपादन केले आहे.

या यशाबद्दल संस्थेचे सचिव राहुल सोनवणे, कोषाध्यक्ष रवी सोनवणे, मुख्याध्यापक बी. यु. चौधरी, एम.बी.माने मॅडम, एस. एस. पवार, यु.एम.सिरसट, पी.पी.तांबडे, के.जी.चौधरी, ए.सी.राऊत, ए. डी. धस आणि ईतर शिक्षक तसेच ॲड.तानाजी चौधरी आणि श्रीमती ए.एम.घुटे मॅडम आदिंनी अभिनंदन केले आहे.

 
Top