धाराशिव (प्रतिनिधी)-गांजा तस्करी करीत पळून जाणाऱ्या आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, स्थानिक गुन्हा शाखेचे पथक कळंब तालुक्यात पेट्रोलिंग करत असताना त्यांना स्कुटी व बुलेट यावर येत असलेले दिसले. मोहा रोडवर स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने त्यांना थांबविण्याच्या प्रयत्न केला. ते तेथुन पळून जात असताना पथकाने त्यांचा पाठलाग करुन त्यापैकी दोन इसमांना पकडले. बुलेट वरील दोन इसम त्यांच्या ताब्यातील बुलेट व भरलेले पोते जागीच रोडला टाकून अंधाराचा फायदा धेवून तेथुन पळून गेले. सुक्टीवरील पकडलेल्या इसमांना त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्याची नावे सौरभ संजय काळे, वय 24 वर्षे, रा. इंदीरानगर कळंब, सोबत विधी संघर्ष बालक यांना पोत्यामध्ये काय आहे असे विचारपुस करता त्यामध्ये गांज्या असल्याचे सांगितले. तो बालाजी छगन काळे, रा. मस्सा(ख) ता. कळंब व संजय राजेंद्र उर्फ दादा काळे रा. मस्सा (खं) ता. कळंब यांच्याकडून विकत घेतला आहे. तो आम्ही जामखेड, जि. अहमदनगर येथे विक्री करण्याकरीता घेवून जात असल्याचे सागिंतले. तसेच नमुद आरोपीच्या ताब्यातील पोत्यातुन एकुण 20 पाकीटात मिळालेला एकुण 40 किलो 260 ग्रॅम वजनाचा एकुण 8 लाख 5 हजार 200 किंमतीचा गांजा, मोटरसायकलसह असा एकुण 10 लाख 200 रूपये किंमतीचा माल जप्त करुन पोलीस ठाणे येथे  एन. डी. पी. एस. कायदा कलम 8(क), 20(ब), 20(क) अन्वये गुन्हा नोदंवला असुन सदर गुन्ह्याचा अधिक तपास सहायक्क पोलीस निरीक्षक कांबळे पोलीस ठाणे कळंब हे करत आहेत.

जिल्हा पोलीस अधीक्षक  अतुल कुलकर्णी व अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन,  उपविभागीय पोलीस अधिकारी कळंब संजय पवार यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे, पोलीस ठाणे कळंबचे पोलीस निरीक्षक सानप, सहाय्यक पोलीस निरीक्षक  सचिन खटके, कळंब पोलीस ठाणेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कांबळे, पोह हुसेन सय्यद, अश्विन जाधव, प्रदिप वाघमारे, मपोह शोभा बांगर, पोना नितीन जाधवर, बबन जाधवर, पोअं योगेश कोळी, चालक महेबुब अरब, संतोष लाटे, चालक प्रशांत किवंडे, तांबडे, जाधव, शेख, तारळकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

 
Top