भूम (प्रतिनिधी)- चांगल्याच्या संगतीत राहिल्यास चांगलेच गुण अंगी जडतात. प्रत्येकाने चांगलीच संगत धरावी असे आवाहन अध्यात्मिक व धार्मिक विचारसरणीचे योगेश ज्ञानेश्वर आसलकर यांनी नव उद्योजकांच्या सत्कार प्रसंगी बोलताना केले.
भूम येथील कै. विलास शंकरराव रोकडे फाउंडेशनच्या वतीने गेल्या तीन वर्षापासून भूम व पुणे येथे व्यसनमुक्ती केंद्र नवनाथ रोकडे यांच्या पुढाकारातून चालवले जात आहे. या व्यसनमुक्ती केंद्राच्या माध्यमातून तीन वर्षाच्या कालावधीत जवळपास 700 व्यसनाधीन व्यक्तींना व्यसनमुक्त केले आहे. याच व्यसनमुक्तीच्या माध्यमातून अनेकांना व्यवसाय, उद्योग, रोजगारही मिळवून दिला आहे. या निमित्ताने नवनाथ विलास रोकडे यांना महाराष्ट्राचा अभिमान - नव उद्योजकांचा सन्मान पुणे यांच्याकडून महाराष्ट्र उद्योजक पुरस्कार 2024 व पुरस्कार महाराष्ट्राचा - गौरव कर्तृत्वाचा - महा उद्योजक रत्नदिप उद्योजक पुरस्कार 2024 अशा दोन पुरस्काराने पुणे येथे सन्मानित केल्याच्या निमित्ताने त्यांचा मंगळवार दि 29/7/2024 रोजी भूम एमआयडीसी येथे त्यांच्या मित्र परिवारांच्या वतीने सन्मान करून शुभेच्छा दिल्या आहेत.
गेल्या तीन वर्षापासून भूम येथील एमआयडीसी मध्ये सुसज्य अशा इमारतीमध्ये कैलासवासी विलास शंकरराव रोकडे फाउंडेशनच्या माध्यमातून व्यसनमुक्ती केंद्र चालू आहे. याच फाउंडेशनच्या माध्यमातून पुणे येथील येथे देखील व्यसनमुक्ती केंद्र चालू आहे या दोन्ही व्यसनमुक्ती केंद्र च्या माध्यमातून तीन वर्षाच्या कालावधीत जवळपास सातशे व्यसनाधीन व्यक्तींना व्यसनमुक्त करण्याचे महत्त्वाचे काम नवनाथ रोकडे यांच्या माध्यमातून झाले आहे.
या व्यसनमुक्त केंद्रात दाखल केलेल्या व्यसनाधीन व्यक्तींना व्यसनमुक्त करण्यासाठी साधारणपणे तीन महिने कालावधीपर्यंत ठेवले जाते या कालावधीत त्यांना जीवनाची निवासाची आरोग्याची मनोरंजनाची व्यवस्था देखील केलेली आहे त्यांना योगाचे प्रशिक्षण देण्यासाठी समुपदेशक कमलेश डंबरे नागपूरकर तसेच अक्षय घे मोड अहमदनगर नवनाथ वरवडे हे परिश्रम घेत आहे.
वसंत केंद्रातील व्यक्तींना नियमित सकाळी योगाचे धडे दिले जातात नाश्ता दिला जातोय जेवण चहा पाणी वेळेवर दिले जातात याशिवाय अध्यात्मिकतेचे धडे देखील दिले जातात यासाठी प्रवचनकार कीर्तनकार या ठिकाणी आवर्जून प्रबोधना करण्यासाठी येतात योग्य वरून संजीवन सातपुते हे देखील आवर्जून येतात.
व्यसनमुक्त केंद्रातील सर्व माहिती मिळवणे धाराशिव जिल्हा रुग्णालयाच्या संबंधित विभागाकडे वेळोवेळी सादर केलेला आहे सिव्हील सर्जन, जिल्हा रुग्णालय कर्मचारी देखील वेळ व्यसनमुक्ती केंद्रला भेट देऊन पाहणी करतात, या व्यसनमुक्ती केंद्र प्रमुख नवनाथ रोकडे यांना पुणे येथील राज्यस्तरावरील दोन परस्कार 15 दिवसात मिळाले आहेत, त्यांच्या या यशाबद्दल त्यांच्या मित्र परिवाराने विशेष कौतुक करून शुभेच्छा दिल्या आहेत. या व्यसनमुक्त केंद्रामध्ये आज पर्यंत नागपूर, पूणे, सातारा, सांगली, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, बिदर, बीड, धाराशिव जिल्ह्यातून व्यसनाधीन व्यक्तींना सहभागी झाल्याचे दिसून आले आहे.
यावेळी अध्यात्मिक व धार्मिकी विचाराचे योगेश आसलकर, विठ्ठल बागडे, पत्रकार शंकर खामकर , प्रशिक्षक कमलेश डंबरे नागपूरकर समुपदेशक, नवनाथ वरवडे, अक्षय घेमूड - नगरकर, राहूल होगाडे, बालाजी माने यांचेसह आनेकांची उपस्थिती होती.