धाराशिव (प्रतिनिधी)-देशाचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यशैलीवर व महायुती सरकार तसेच देवेंद्र फडणवीस यांच्यामार्फत घेण्यात येत असलेले समाजाच्या हिताचे निर्णय याच्यावर प्रभावित होऊन धाराशिवचे नेते व आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या कार्यपद्धतीवर व नेतृत्वावर विश्वास ठेवून तसेच युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर यांच्या मार्गदर्शनाने धाराशिव शहर व परिसरातील असंख्य युवकांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला.
महायुती सरकारमार्फत राज्यातील महिलांकरिता त्याचप्रमाणे युवकांसाठी असणारे महत्त्वपूर्ण निर्णय हे सरकार घेत आहे त्याचप्रमाणे सर्व घटक लक्षात लक्षात घेऊन जे निर्णय होत आहेत त्यामुळे सर्वांना त्याचा फायदा होणार आहे म्हणून असंख्य युवक भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश करत आहेत. यामध्ये प्रामुख्याने टाकळी (ढो.) ता.धाराशिव येथील विकास पाटील, लखन बटणपुरे,राजाभाऊ ठाकर,परमेश्वर गवळी,काका भोसले,गणेश ढगे,ओंकार साबळे, वसंत ठोंबरे,प्रदीप बिटे,नवनाथ ढगे,ओंकार पाटील,हर्षद बंडगर त्याचप्रमाणे लोंढे प्रतिष्ठान धाराशिव संस्थापक सुरज लोंढे व उपळे (मा.) ता. धाराशिव येथील प्रशांत गायकवाड व लखन कांबळे यांच्यासह सहकारी युवक यांचा पक्ष प्रवेश घेण्यात आला. या प्रवेशासाठी भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश चिटणीस सचिन लोंढे यांनी पुढाकार घेतला यावेळी उपळे (मा) माजी ग्रामपंचायत सदस्य अमित कांबळे व असंख्य युवक उपस्थित होते.