धाराशिव (प्रतिनिधी)-आपणा सर्वांना माहिती आहे की निवडणूक आयोगातर्फे येत्या 25 जुलै 2024 पर्यंत मतदार नोंदणी अभियान चालविल्या जात आहे त्याच अनुषंगाने आपणा सर्वांच्या सोबत बैठकीच्या माध्यमातून चर्चा करून ठरविलेल्या विषयाप्रमाणे आपल्या राज्याचेउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर, आमदार राणाजगजितसिंह पाटील, माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली व भाजप जिल्हाध्यक्ष संताजीराजे चालुक्य यांच्या मार्गदर्शनाखाली व भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष तथा धाराशिव जिल्हा प्रभारी अजित पाटील कव्हेकर यांच्या प्रमुख उपस्थीतीमध्ये व भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर यांच्या नेतृत्वात धाराशिव मध्ये नव मतदार नोंदणी अभियानाचे आयोजन केले गेले.
या मतदार नोंदणी अभियानाला युवक व नागरीकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या मध्ये जवळपास एकशे शहात्तर नव मतदार नोंदणी व सदोतीस मतदार दुरुस्ती चे अर्ज स्वीकारून ते या अभियानाच्या माध्यमातुन पुर्णत्वास नेहणार आहोत. या अभियानास माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, तेरणा युथ फाऊंडेशनचे मेघ पाटील, शहराध्यक्ष अभय इंगळे, माजी गट नेते युवराज नळे, अमोल राजेनिंबाळकर, संदिप इंगळे, शेषेराव बप्पा उंबरे, देवा नाईकल, प्रविण शिरसाठ, सागर दंडनाईक, उदय बनसोडे यांनी सदीच्छा भेट दिली.
हे अभियान यशस्वी करण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चाचे सुजित साळुंके, अतुल कावरे, सुनिल पुगुंडवाले, गणेश ऐडके, सलमान शेख, प्रसाद मुंडे, अभिषेक पवार, विशाल पाटील, बालाजी जटाळे, नवनाथ सोलंकर, सार्थक पाटील, सुजित उंबरे, आकाश तावडे, शकंर मोरे, गणेश इंगळगी, धनराज नवले, बिन्नी तावसकर, सम्यक माळाळे, आदि माने, अभय ढोबळे, अशिष येरकळ, चैतन्य माने, योगेश मुळे, करण मुंडे इत्यादी उपस्थीत होते.