ढोकी (प्रतिनिधी)- विशालगड,गजापुर (जि कोल्हापूर)  गावातील मुस्लिम कुटुंबावर व धार्मिक स्थाळावर भ्याड हल्ला करणा-या जातीयवादी संघटनेच्या कार्यकर्त्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी. अशी मागणी ढोकी येथील मुस्लिम बांधवांनी ढोकी पोलिस स्टेशन मार्फत मुख्यमंञी यांच्याकडे शुकवार दि.19 रोजी करण्यात आली आहे. 

ढोकी येथील मुस्लिम बांधवानी दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले की, रविवार दि.14 रोजी विशालगड कोल्हापुर येथील गडावरील आतिक्रंमण उठवण्याच्या  कारणावरून जे नियोजित अंदोलन करण्यात आले होते. त्या गडाच्या पायथ्याशी जि छोटी छोटी गांवे आहेत त्या गावात जातीयवादी संघटनेच्या दहशतवादी लोकांनी एकत्र येऊन तेथील गरीब कुटुंबातील मुस्लिम समाजाच्या लोकांवर भ्याड हल्ला करुन महिला व लहान लहान मुले -मुली व वृध्द यांना आमानुष मारहाण करून त्यांची चार चाके व दोन चाके वाहाने,घरे जाळपोळ करुन आर्थिक नुकसान केले. तसेच त्यांची घरातील सोन्याचे दागिने चोरी केली व धार्मिक स्थाळावर भ्याड हल्ला करुन धार्मिक स्थळांचे नासधुस करुन पविञ नष्ट केले. त्या गोष्टीचा आम्ही ढोकीतील बांधव तिर्व जाहिर निषेध करत आहोत. विशालगड गजापुर परिसरातील भयभीत नागिरिकांना सरंक्षण देऊन भ्याड हल्ला करणा-या जातीयवादी संघटनावर कडक कारवाई करून ज्या लोकांचे आर्थिक नुकसान झाले अशांना राज्य शासनाकडून ताबडतोब नुकसान भरपाई देण्यात यावी व संघटनेच्या कार्यकर्त्यांवर कडक कलमे लावुन सरकारी कामात अडथळा पोलिसांवर हल्ला, महिलांचे विनयभंग, घरफोडी, लुटामार, प्रार्थना स्थाळावर दगडफेक, धार्मिक ग्रंथ पेटविणा-या समाजकंटवावर कायदेशीर कारवाई करावी. तसेच मुस्लिम समाज व त्यांचे धार्मिक स्थळे यांना पुर्ण सरंक्षण देण्यात यावे व विशालगड आतिक्रंमण हटाव मोहीम हातात घेऊन घटनेस जे जवाबदार आहेत. त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अन्यथा समाजाच्या वतीने धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयावर लोकशाही मार्गाने धरणे अंदोलन व विराट मोर्चा काढु असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.

अशी मागणी ढोकी येथील मुस्लिम बांधवानी ढोकी पोलिस स्टेशनचे सपोनि संतोष तिखोटे यांच्या मार्फत मुख्यमंञी एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदन देऊन केली. या निवेदनावर शाकेर शेख,सुभान इनामदार,इम्रान शेख,सुलतान काझी,आयुब पठाण,मोईन कुरेशी,सोहेल काझी यांच्यासह शेकडो मुस्लिम बांधवाच्या स्वक्ष-या आहेत.

 
Top