उमरगा (प्रतिनिधी)- शेतीला जोडधंदयाची गरज आहे. पारंपारिकतेला प्रयोगशील शेतीची जोड घालणे गरजेचे आहे. सेंद्रिय शेती, गटशेती, फळबाग लागवड, कृषी प्रक्रिया उद्योग व कृषी पूरक व्यवसाय करण्याचे आवाहन केले. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली असून याचा जास्तीत जास्त माता भगिनींना लाभ मिळवून देण्यासाठी गावोगाव जनजागृती अभियान राबविण्याचे आवाहन आमदार ज्ञानराज चौगुले यांनी केले.

हरितक्रांतीचे प्रणेते तथा महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त पंचायत समिती सभागृहात सोमवारी (दि.1) आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमासाठी तहसीलदार गोविंद येरमे, गटविकास अधिकारी डॉ. प्रशांतसिंह मरोड,माशाळकर, शिवसेना तालुकाप्रमुख बळीराम सुरवसे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी कृषी क्षेत्रामध्ये केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल उमेद कृर्षी व्यवस्थापक किशोर औरादे , बालाजी सुरवसे, महिला बचत गटाच्या कृषी सेवा केंद्राच्या संचालिका सौ. माया हराळे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी  कृषी विद्यावेता डॉ. वसंत सूर्यवंशी  यांनी सोयाबीन व तूर या मुख्य पिकाची पेरणी नंतर घ्यावयाची काळजी, किड व रोग व्यवस्थापन याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. डॉ. प्रशांतसिंह मरोड गटविकास अधिकारी उमरगा यांनी पंचायत समिती मार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली तसेच तालुका कृषी अधिकारी श्री ज्ञानोबा रितापुरे यांनी कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली. यासाठी महाडीबीटी द्वारे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन केले. यावेळी शेतकरी, उमेद अभियान अंतर्गत महिला बचत गटाच्या सदस्या  मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीनिवास पाटील यांनी केले तर संजय राऊत यांनी आभार मानले.

 
Top