उमरगा (प्रतिनिधी)- येथील श्रमजीवी कॉलेज ऑफ फार्मशीच्या औषध निर्माण शास्त्र पदविकेच्या विद्यार्थ्यानी नुकत्याच झालेल्या वार्षिक परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. श्रमजीवी डी फार्मशीचा 96 टक्के निकाल लागल्याने यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला.

महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ मुंबई यांच्या वतीने एप्रिल, मे महिन्यात वार्षिक परीक्षा घेण्यात आल्या. या परीक्षेत श्रमजीवी डी. फार्मशीच्या परीक्षार्थीनी घवघवीत यश संपादन केले आहे. डीफार्मशी च्या प्रथम वर्षात शिकणाऱ्या सानिया शेख ने 85 टक्के गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला आहे. मानसी साळुंके ला 83 टक्के गुण घेऊन महाविद्यालयात द्वितीय येण्याचा मान मिळवला आहे. सुप्रिया राठोड 82.7 टक्के गुणांसह तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे. तसेच डी फार्मशी द्वितीय वर्गातील प्रणवती डिग्गेने 80 टक्के गुणासह महाविद्यालयात प्रथम क्रमांक, तनुजा बनसोडेने 80 टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक तर नंदिनी ठाकूर व गौरी कुबसे या विद्यार्थीनींनी 79 टक्के गुण मिळवून महाविद्यालयात तृतीय क्रमांकाचे यश संपादन केले आहे. श्रमजीवी शिक्षण प्रसातक मंडळचे अध्यक्ष विनायकराव पाटील, सरचिटणीस माजी मंत्री बसवराज पाटील, सचिव रामकृष्णपंत खरोसेकर, सर्व संचालक मंडळ व प्राचार्य डॉ. दिलीप गरुड यांच्या वतीने यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले. प्राचार्य डॉ. श्रीराम पेठकर , उपप्राचार्या ज्योति आरसुडे पेठकर, प्रा. संद्या पाटील, प्रा. दिपाली भुरे, प्रा. रंजना पांचाळ, प्रा. ममता सुरवसे माने, प्रा. स्वप्नाली चौधरी, प्रा. वैभव मुळे यांचे यशस्वी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले.

 
Top