धाराशिव (प्रतिनिधी)- श्री संत शिरोमणी सावता महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त सावित्रीबाई फुले महिला मंडळ आयोजित केलेल्या गुरुवर्य नंदकिशोरजी महाराज (गोंदीकर ) जालना यांच्या श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ सप्ताहास प्रारंभ झाला. या सप्ताहाचे ठिकाण स्वयंवर मंगल कार्यालय, बार्शी नाका येथे आहे. दुपारी दोन ते सहा या वेळेत ही भागवत कथा होईल.
संगीत साथ हामोनियम व गायन साठी पारगाव घुमरा येथील हरी महाराज काळे तर तबला साथ विक्रम महाराज खुळे वैजाळा यांची उपस्थिती आहे. अतिशय उत्साहामध्ये सुरू असलेल्या या भागवत कथेसाठी सर्व भगवत भक्त, भाविक बंधु भगिनींनी या भागवत कथेचाअधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन सावित्रीबाई फुले मंडळाच्या वतीने करण्यात येत आहे.