उमरगा (प्रतिनिधी)-येथिल बहुजन हिताय विद्यार्थी वसतिगृहात रविवारी(दि.30) त्रिरत्न बौद्ध महासंघाचे नवदीक्षित धम्मचारी यांचा सत्कार करण्यात आला.पुणे जिल्ह्यातील सधम्म प्रदिप शिबिर केंद्रात येथिल धम्मचारी जीनघोष आणि जिनोदय यांना नऊ जून रोजी धम्मचारी यांची दीक्षा झाली. त्यानंतर बौद्ध बांधवांच्या वतीने सत्कार आयोजित करण्यात आला होता.

यावेळी त्रिरत्न बुद्धिष्ट सेंटरचे चेअरमन धम्मचारी रत्नपालित, लातूर केंद्राचे चेअरमन धम्मचारी कल्याणदस्सी, धम्मचारी प्रज्ञाजित,धम्मचारी ज्ञानपालित, धम्मचारी विबोध, धम्मचारी धम्मभूषण आदींची उपस्थिती होती. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते तथागत भगवान बुद्ध, डॉ बाबासाहेब आंबेडकर, भन्ते संघरक्षित यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.धम्ममित्र काजल गायकवाड,संगीता कांबळे,संगीता सावंत यांनी पाली पूजेचे नेतृत्व केले.नवदीक्षित धम्मचाऱ्यांनी शरण गमनचा इतिहास कथन केला. तब्बल तीस वर्षाच्या कठीण परिश्रमाने धम्माचरणातून तावून सुलाखून धम्म जीवन जगण्याचा सराव केल्याने ही दीक्षा प्राप्त झाली असून यात संघ सदस्य,मित्रच्यापटर,कल्यांनमित्रता, परिणामकारक शरण गमन,बुद्धधम्म संघावर असलेली श्रद्धा,तथागत भगवान बुद्ध,भन्ते संघरक्षित,डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मदृष्टीची उकल, धम्माभ्यास यांचा विचार करून ही दीक्षा मिळाल्याने त्यानीं या बद्धल कृतज्ञता व्यक्त केली.धम्मचारी कल्याणदस्सी यांनी नवदीक्षितांच्या कार्यास शुभेच्छा देऊन धम्मदेसना दिली.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी धम्ममित्र जालिंदर कांबळे, अमर कांबळे,तानाजी कांबळे,हरिदास कांबळे,महादेव भोसले,आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धम्मचारी धम्मभूषण यांनी केले तर धम्मचारी प्रज्ञाजित यांनी आभार मानले धम्मपालन गाथेने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.     

 
Top