धाराशिव (प्रतिनिधी)-वसंतराव फुलसिंग नाईक हे प्रख्यात कृषीतज्ञ, प्रगतशील शेतकरी व राजनीतीज्ञ होते. ते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी सर्वाधिक काळ विराजमान होते. त्यांचा जन्म पुसद जवळील गहुली या छोट्याशा खेड्यात सदन शेतकरी कुटुंबात झाला. ते पंचायतराज,श्वेतक्रांती,रोजगार हमी योजनेचे जनक म्हणून ओळखले जातात. 1972 मधील महाराष्ट्रातील भीषण दुष्काळा दरम्यान त्यांनी शेतकऱ्यांसाठी मदतीच्या दुर्गामी योजना राबवल्या, महानायक वसंतराव नाईक यांना केवळ शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाणीव नव्हती तर दुर्गामी स्वरूपाच्या उपायोजना सुद्धा त्यांनी केल्या आणि शेतकरी बांधवांशी आपली नाळ जुळवून ठेवली  असे उद्गार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख यांनी वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त बोलताना काढले .

धाराशिव येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात 1 जुलै 2024 रोजी कृषीतज्ञ वसंतराव नाईक यांची जयंती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख बोलत होते. ते पुढे म्हणाले की, कठीण काळात देखील नाईक यांनी क्रांतिकारी कार्य केलेले आहे त्यामुळे त्यांना शेतकऱ्यांचा जाणताराजा हरितयोद्धा म्हणून ही ओळखले जाते. याप्रसंगी नॅक चे सहसमन्वयक डॉ. सदिप देशमुख, डॉॅ. केशव क्षिरसागर, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपराचार्य बबन सूर्यवंशी आदींसह महाविद्यालयातील सर्व गुरुदेव कार्यकर्ते उपस्थित होते.

 
Top