भूम (प्रतिनिधी)- राजे संभाजी पब्लिक स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय ईट (ता. भूम) येथे (ता.4) गुरुवार रोजी दुपारी 2 वाजता पंचायत समिती भूम गट शिक्षणाधिकारी राहुल भट्टी यांनी भेट दिली. शाळेच्या भौतिक सुविधा क्रीडांगण आदींची पाहणी केली. शाळेमध्ये असलेल्या भौतिक सुविधेबद्दल कौतुक केले. यावेळी शिक्षण विस्तारधिकारी अनिता जगदाळे, विजयकुमार कोकाटे यांच्यासह संस्थेचे सचिव प्रा.डॉ.आप्पासाहेब हुंबे उपस्थित होते. यावेळी राहुल भट्टी यांचा सत्कार प्रसंगी मुख्याध्यापक एम.एस.जालन, प्रा.भाऊसाहेब हुंबे, प्रा.भारती आसलकर, प्रा.आकांक्षा जाधव, सुनिता भोईटे,सपना कावळे, पल्लवी खारगे,सुधा जोशी,नेहा धोत्रे, भाग्यश्री पवार,उज्वला हुंबे ,ज्ञानेश्वर हुंबे, विवेक डीकुळे, सुरज लोळके आदी उपस्थित होते.

 
Top