परंडा (प्रतिनिधी)- येथील परंडा शहरातील बावची रोडवर गेल्या एक महिन्यापासून मुख्य रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडल्याने त्यामध्ये मोठ्या प्रमाणात घाण पाणी साचले होते. त्यामधून विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी शाळा महाविद्यालयांमध्ये ये-जा करावे लागत होते. येण्या जाण्याची खूप मोठी अडचण झाली होती. त्यामध्ये कच्चा मुरूम टाकल्याने आणखीनच रस्ता चिखलमय झाला आहे. यामुळे विद्यार्थ्यांना सायकलवर तसेच मोटरसायकलवर  ये-जा करताना मोठी कसरत करावी लागत आहे. महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांना आपली वाहने घेऊन ऑफिसला जाता कठीण झाले आहे. तसेच या रस्त्यावर शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांना वयस्कर लोकांना येणे जाण्याचा हा मुख्य रस्ता असून त्यामध्ये अनेक वयस्कर लोक या खड्ड्यामध्ये पडले आहेत. तर अनेक गाड्या स्लिप झाल्या आहेत. अनेक विद्यार्थी या रस्त्यावरून पडले त्यामुळे गेल्या एक महिन्यापासून अनेक वृत्तपत्रांमध्ये बातमी प्रसिद्ध करून प्रशासनाने थोडेही लक्ष न दिल्याने व लोकप्रतिनिधींनीही दुर्लक्ष केल्याने शेवटी कंटाळून महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी प्राचार्य यांच्याकडे तक्रार केली. त्यानुसार सर्व कर्मचाऱ्यांनी उपविभागीय अधिकारी वैशाली पाटील आणि तहसीलदार घनश्याम अडसूळ यांना विद्यार्थ्यांच्या हस्ते निवेदन दिले. 

तहसिल कार्यालयात एवढी मोठी संख्या विद्यार्थ्यांची जमा झाल्याने तातडीने उपविभागीय अधिकारी वैशाली पाटील व तहसीलदार घनश्याम अडसूळ यांनी संबंधित कार्यालयातील अधिकाऱ्यांना फोन करून ताबडतोब रस्ता दुरुस्त करण्याचे आदेश दिले. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी समाधान मानले. जर दोन दिवसात रस्ता दुरुस्त न झाल्यास रस्ता रोको आंदोलन करण्याचे करणार असल्याचे विद्यार्थ्यांनी म्हटले आहे. यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी आपली मते व्यक्त केली. महाविद्यालयाचे स्टाफ सेक्रेटरी डॉ. शहाजी चंदनशिवे,कनिष्ठ विभागाचे पर्यवेक्षक प्रा किरण देशमुख, प्रा. विजय जाधव, प्रा. दीपक हुके, प्रा. डॉ. विशाल जाधव यांनीही रस्ता दुरुस्तीसाठीची विनंती केली. रिया शिंदे, काशीद यांनीही उपविभागीय अधिकारी वैशाली पाटील व तहसीलदार घनशाम आडसूळ यांना येण्या जाण्याचा कसा त्रास होतो याबद्दल सविस्तर वृत्तांत सांगितला. यावेळी महाविद्यालयातील कनिष्ठ वरिष्ठ विभागातील प्राध्यापक, शिक्षकेतर, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांच्या तक्रारीनुसार सदर निवेदन देण्याचे आयोजन केले होते. याप्रसंगी प्रा. डॉ. गजेंद्र रदील, प्रा. डॉ. अरुण खर्डे, प्रा. दीपक हुके, प्रा. प्रताप घुटे, प्रा. रामेश्वर गायकवाड, प्रा. अनंत अनुभुले, प्रा. डॉ. प्रकाश सरवदे, प्रा. उत्तम कोकाटे, प्रा. अंकुश शंकर, प्रा. प्रकाश भालेराव, प्रा. कृष्णा लांडगे, प्रा. कोपनर आदी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top