भूम (प्रतिनिधी)- कोल्हापुर येथील विशालगड च्या पायथ्याशी असणाऱ्या छोट्या वस्ती व गाजापुर गावात गरीब मुस्लिम कुटुंबावर व धार्मिक स्थळावर जातीयवादी संघटनाच्या कार्यकर्त्यांनी जो भ्याड हल्ला केला आहे. त्याचा निषेध करून हल्लेखोरांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी मुस्लिम एकता संघटनेच्या व एम आय एम पक्षाच्या वतीने 18 जुलै रोजी उपविभागीय अधिकारी भुम यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांच्याकडे करण्यात आली.
विशालगड येथे 14 जुलै रोजी गडावरील अतिक्रमण उठवण्याच्या कारणावरुन गावात जातीयवादी संघटनेच्या दहशतवादी गटाच्या लोकांनी एकत्र येऊन तेथील गरीब कुटूंबातील मुस्लिम समाजाच्या लोकांवर भ्याड हल्ला केला. तसेच दुकाने, घरे, चार चाकी व दुचाकी वाहने यांची जाळपोळ केली. लहान लेकर, महिलांना मारहाण केली. या घटनेचा आम्ही तिव्र निषेध करीत आहोत. या बाबीची आपण गांभिर्याने दखल घ्यावी, जेणेकरुन भविष्यात समाजामध्ये
शांतता टिकुन राहील, असेही निवेदनात म्हटले आहे.
निवेदनावर आसिफ भाई जमादार मुस्लिम एकता संस्थापक अध्यक्ष, यजाज काझी एम आय एम तालुका अध्यक्ष,फिरोज पठाण शहर अध्यक्ष, गौस बाबु शेख, जफर पठाण,लायकअली पठाण,अश्फाक पठाण ,याकुब पीरजादे, इरफान हकीम, अलीम शेख ,सद्दाम मोगल, शमशेर पठाण ,लाला पीरजादे, सुलेमान पठाण, अमन बागवान, आफताब जमादार,सुधीर साळुंखे,दानिश शेख, शाहरुख पठाण, अरबाज पठाण, सकलेन शेख,हबीब फकीर,फरजान काजी, आखिलेश जमादार आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.