धाराशिव (प्रतिनिधी)- येथील श्रीपतराव भोसलेमध्ये इयत्ता 8 वीच्या वर्गाचा स्कॉलरशिपच्या नियोजनाबाबत पालक मेळावा आयोजित करण्यात आला होता.
यावेळी आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाच्या सरचिटणीस प्रेमाताई पाटील तसेच संस्थेचे कार्यकारी अधिकारी आदित्य पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रथम मान्यवरांचे स्वागत प्रशालेमार्फत करण्यात आले. त्यानंतर स्कॉलरशिपचे विभाग प्रमुख के.जी निकम यांनी प्रास्ताविकात वर्षभराचे नियोजन सादर केले. तर सरचिटणीस प्रेमाताई पाटील व संस्थेचे कार्यकारी अधिकारी आदित्य पाटील यांनी पालक व विद्यार्थी तसेच अध्यापकांना मौलिक सूचना केल्या. याचबरोबर प्राचार्य नंदकुमार नन्नवरे यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी उपमुख्याध्यापक प्रमोद कदम व पर्यवेक्षक सुनील कोरडे व स्कॉलरशिपला अध्यापन करणारे दयानंद शिराळ, शरद क्षीरसागर, सुभाष संकपाळ, नेताजी मुळे, राजाभाऊ पवार, अभिजीत पाटील तसेच पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.