धाराशिव (प्रतिनिधी)- लातूर, धाराशिवसह राज्यात आणि देशभरात सहकार महर्षी मा.दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनामुळे लौकिक प्राप्त केलेल्या व नुकताच मांजरा परिवारात समाविष्ट झालेल्या मांजरा शुगर (कंचेश्वर) कारखान्यात 2024-25 हंगाम सुरू होण्याच्या दृष्टीने मील रोलरचे पुजन विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख,आ.धिरज विलासराव देशमुख व रीड लातूर उपक्रमाच्या संस्थापक सौ. दीपशिखाताई धिरज देशमुख, वंश देशमुख,दिवीयाना देशमुख यांच्या हस्ते संपन्न झाले. यासोबतच कारखाना परिसरात वृक्षारोपण देखील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी जागृती शुगरचे व्हा.चेअरमन लक्ष्मणराव मोरे,रेणाचे चेअरमन सर्जेराव मोरे,जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष प्रमोद जाधव, दिपक जवळगेकर, मुकुंद डोंगरे, धिरज पाटील, विनोद पाटील, माजी जि.प.अध्यक्ष संतोष देशमुख, रेणाचे व्हा चेअरमन अनंतराव देशमुख,जिल्हा बँक संचालक राजकुमार पाटील,अनुप शेळके,संभाजी रेड्डी,मांजरा कारखान्याचे कार्यकारी संचालक पंडीत देसाई, जागृतीचे व्यवस्थापक गणेश येवले, जिल्हा बँक कार्यकारी संचालक एच जे जाधव,मांजरा शुगरचे जनरल मॅनेजर सतिश वाकडे, जनरल मॅनेजर फिल्ड अँड कृषी अधिकारी रामानंद कदम,टेक.जनरल मॅनेजर अजित कदम, चिफ केमिस्ट,बाळासाहेब पेठे, मुख्य शेतकी अधिकारी नारायण धांडे,डिस्टलरी मॅनेजर उत्तम -हायकर, कार्यालयीन अधिकारी अभय तिवारी,सिव्हील इंजिनीअर,गोकुळ थावरे,परचेस ऑफीसर संतोष जाधव आदींची उपस्थिती होती.
मागील गळीत हंगामात कारखान्याने गाळपास आलेल्या ऊसाला 10 दिवसात संपूर्ण एफआरपीचे एकरकमी ऊस बील देवून शेतकरी बांधवांच्या मनात विश्वास निर्माण केला असल्याने गळीत-हंगाम 2024-25 मध्ये आपला ऊस गाळपासाठी मांजरा शुगर (कंचेश्वर) कडे देणार असल्याचा निर्धार ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी केला असल्याचे दिसून येत आहे.