भूम (प्रतिनिधी)- येथील विलास बाळासाहेब शाळु यांची धाराशिव जिल्हा ब्राह्मण महासंघाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. भूम शहरातील काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी विलास शाळु यांचीआज सोलापूर येथील शिवस्मारक सभागृहात झालेल्या मेळाव्यात धाराशिव जिल्हा ब्राह्मण महासंघाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे. त्यांच्या निवडीबद्दल त्यांचे जिल्ह्यातून अभिनंदन होत आहे.