धाराशिव (प्रतिनिधी)-  पवन चक्कीचे कॉपर वायर चोरी करणाऱ्या चोरास स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. आरोपीकडून 2 लाख 12 हजार रूपयांची कॉपर वायर जप्त करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, धाराशिव जिल्ह्यातील मालाविषयक गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेवून मालाविषयक गुन्हे उघड व पाहिजे फरारी आरोपीचा शोध घेण्यासाठी पेट्रोलींग करित असताना येरमाळा उडाणपुल येथे आले. पथकास बातमी मिळाली की, अनिल उर्फ बापु दत्ता पवार रा. कोठाळवाडी ह.मु. उंबरा पारधी पिढी ता. कळंब जि. धाराशिव यांनी त्याचे राहते घराचे पाठीमागे पोत्यामध्ये काहीतरी चोरीच्या वस्तु लपवून ठेवल्या आहेत.  तो सध्या त्याच्या घरात आहे. अशी बातमी मिळाल्यावरुन पथकाने नमुद ठिकाणी जावून त्यास ताब्यात घेवून त्याचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्याचे नाव अनिल उर्फ बापु दत्ता पवार, वय 24 वर्षे, रा. कोठाळवाडी ह.मु. उंबरा पारधी पिढी ता. कळंब जि. धाराशिव असे सागिंतले. त्यास पथकाने त्याचे घराचे पाठीमागे घेवून गेले असता पथकास पांढरे रंगाचे एका खाताच्या पोत्यामध्ये कॉपर वायर मिळून आली. कॉपर वायर बाबत त्याच्याकडे विचारपुस केली असता त्यांनी सांगितले की, मी व माझ्या सोबत अन्य 10 ते 15 लोकांनी मिळून मागील वर्षी व चालू वर्षात यसवंडी, घाटपिंप्री, सारोळा, तसेच घाटनांदूर या गावाचे शिवारातील पवनचक्कीचे कॉपर वायरच्या चोऱ्या केल्या आहेत. त्या चोऱ्यातील माझे वाटणीला आलेली वायर आहे असे सागिंतले. त्यावरुन पथकाने गुन्हे अभिलेखाची पाहणी केली असता सदर कॉपर वायर बाबत पोलीस ठाणे वाशी येथे गुन्हे नोंद आहेत. दोन पंचा समक्ष नमुद आरोपीच्या ताब्यातुन नमुद गुन्ह्यातील कॉपर वायर एकुण 2 लाख 12 हजार रूपये किंमतीचे जप्त करुन पुढील कार्यवाही कामी नमुद आरोपीस वाशी पोलीसांच्या ताब्यात दिले. इतर आरोपीचा व मुद्देमालाचा शोध सुरु आहे.

सदरची कामगीरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार, सपोफौ काझी, पोह काझी, पठाण, औताडे, पठाण, चालक भोसले यांच्या पथकाने केली आहे.

 
Top