परंडा (प्रतिनिधी)- भारतीय जनसंघाचे संस्थापक, प्रखर राष्ट्रभक्त डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांना जयंतीनिमित्त माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या संपर्क कार्यालय, परंडा येथे प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी पोपट सुरवसे, युवा मोर्चा जिल्हा चिटणीस रामकृष्ण घोडके, ता.का. सदस्य अविनाश विधाते, युवा मोर्चा शहर उपाध्यक्ष मनोहर पवार, गौरव पाटील, हिमालय वाघमारे उपस्थित होते.

 
Top