तुळजापूर (प्रतिनिधी)- महाराष्ट्राची कुलस्वामीनी श्रीतुळजाभवानी मातेला शुक्रवार दि. 4 जुलै रोजी राञी प्लॅस्टिकच्या रॅपरचा चॉकलेटचा हार घातल्याने अनेक धार्मिक वृत्तीच्या भाविकांमधुन नाराजी गेल्या दोन-तीन दिवसापासून व्यक्त केला जात आहे. या प्रकारामुळे मुर्ती सुरक्षा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या प्रकरणी श्रीतुळजाभवानी मंदीर संस्थान अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे काय भूमिका घेणार याकडे भाविकांचे लक्ष लागले आहे.

श्रीतुळजाभवानी मंदीरातील सिंहासनावर विविध फळे ठेवण्याचे प्रमाण वाढले आहे. ते फळे केमिकल मुक्त होते का? असा प्रश्न आता भाविकांमधुन केला जात आहे. शुक्रवार दि. 4 जुलै रोजी छोट्या छोट्या एक ते दोन रुपये किमतीच्या चाँकलेटची माळ घातल्याचे दिसुन येत असल्याने चाँकलेटमध्ये कुठले केमिकल होते का? व प्लास्टिक बनविण्यासाठी अनेक केमिकलचा वापर केला जातो. अनेकदा प्लास्टिक रिसायकल केलेले असते. म्हणजेच ते कचऱ्यातून गोळा करून बनवले जाते. अश्या गोष्टी अत्यंत पवित्र मानल्या जाणाऱ्या गाभाऱ्यात आणि श्री विग्रहावर घालणे अयोग्य अशा प्रतिक्रिया सोशल मिडीयावरुन व्यक्त होत आहेत. हा हार जाहीरातसाठी तर घातला नाही ना असा प्रश्न पुढे येत आहे.


भाविकांनी श्रध्देनी आणलेला हार घातला - इंतुले 

श्री तुळजाभवानी मातेस बदाम, खारीक, इलायची सह अनेक हार भाविक आणतात ते आम्ही घालतो. सदरील हार भाविकांनी श्रध्देने आणल्याने तो देविला घातला त्यात वाईट काय अशी प्रतिक्रिया सहाय्यक धार्मिक व्यवस्थापक  सिध्देश्वर इंतुले यांनी सांगितले.


विटंबना करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा - भक्त  कलबुर्गी

श्रीतुळजाभवानी मातेस फुलांऐवजी चाँकलेट हार घालुन कुलदेवतेची एक प्रकारे विटंबना केली आहे. या प्रकरणी संबंधितांवर श्रीतुळजाभवानी मंदीर संस्थान अध्यक्ष डॉ. सचिन ओंबासे यांनी कठोर कारवाई करुन देविची होणारी विटंबना थांबवावी अशी मागणी पुणे येथील संजय कलबुर्गी या भाविकाने केली आहे.

 
Top