तुळजापूर (प्रतिनिधी) - तालुक्यातील आलियाबाद येथील ग्रामपंचायत येथे “मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण “योजनेचे अर्ज भरण्यात आले.

जिल्हा प्रशासनाच्या वतीने आज तालुक्यात विशेष कॅपचे आयोजन केले होते.यामध्ये आलियाबाद ग्रामपंचायत येथे  दि.10 जुलै 2024 रोजी माजी सरपंच ज्योतिका चव्हाण यांच्या पुढाकाराने मोफत 75 ते 80 महिलांनी अर्ज दाखल केले. यावेळी सरपंच सुर्यकांत चव्हाण, उपसरपंच अमृता चव्हाण, ग्रामपंचायत सदस्या बायना पवार, कमळाबाई राठोड, शांताबाई राठोड,चांगुणाबाई जाधव, पोलीस पाटील शिवाजी चव्हाण, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष विनायक चव्हाण, माणिक राठोड,नेमिनाथ चव्हाण, सुभाष नाईक, अरुण चव्हाण, सुधाकर राठोड, सुभाष चव्हाण, ग्रामसेवक अविनाश खुंटेगावे, अंगणवाडी सेविका यांच्या सह महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.

 
Top