तुळजापूर (प्रतिनिधी) - श्रीतुळजाभवानी मंदीर संस्थान तुळजापूर येथे विविध पदाकरीता सरळ सेवेने भरती केली जात आहे. या भरती प्रक्रियेची परीक्षा  13 व 14 जुलै 2024 रोजी 19 केंद्रावर ठेवल्या आहेत.

या परिक्षेच्या अनुषंगाने परिक्षा संदर्भात महत्वाचा सुचना श्रीतुळजाभवानी मंदीर संस्थान संकेत स्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तरी ज्या उमेदवारांनी परिक्षेसाठी अर्ज भरलेले आहेत. त्या उमेदवारांनी सदर सुचनांचे अवलोकन करुन अभ्यास करावा व परिक्षेस वेळेपुर्वी यावे असे आवाहन श्रीतुळजाभवानी मंदिर संस्थानने केले आहे.

 
Top