तुळजापूर (प्रतिनिधी) - शहरातील हडको ते शुक्रवार पेठ पाणी टाकी रस्त्यावर प्रचंड पाणी साचल्याने या पाण्यातुन जाताना शालेय विद्यार्थी आणि नागरिक यांना गैरसोयीना समोर जावे लागत आहे.

तुळजापूर शहरातील हाडको वसाहत ते शुक्रवार पेठ पाणी टाकी सिमेंट रस्तावर नुकत्याच झालेल्या पावसाचे पाणी थांबले होते. हा रस्ता प्रमुख असा रस्ता असुन यावरून रहदारी मोठी आहे. माञ जवळपास शंभर मीठर रस्त्यावर पाणी थांबल्याने सकाळी शाळेत जाणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांना पाण्यातुन शाळेत जावे लागले. नागरीकांना ही याच पाण्यातुन मार्गक्रमण करावे लागले. त्यात कमी कि काय म्हणून वाहने या रस्त्यावरून जाताना साचलेले घाण पाण्याचे शितोंडे नागरीकांच्या अंगावर उडत असल्याने त्यांना ही गैरसोयीस सामोरे जावे लागले. एकदंरीत हा सिमेंट रस्ता तयार करुन अनेक वर्ष होवुन ही पावसाचे पाणी या सिमेंट रस्त्यावरून व्यवस्थित जात नसल्याने शहरातील रस्ता कामा बाबतीत प्रश्न चिन्ह निर्माण होत आहेत.

 
Top